नगर : हायजिन फर्स्ट व आय लव्ह नगर यांच्या संयुक्त प्रयत्नाने शहरातील जिल्हा परिषदच्या अनुदानीत व शासकिय वस्तीगृहांचे किचन १५ जुलै ते १ सप्टेंबर या काळात सलग ४ भेटी देऊन व्यवस्थापकांच्या सहाय्याने सर्व किचन स्वच्छ व पेस्ट कंट्रोल करुन घेऊन येणारा कच्चा माल व कच्च्या मालाची साठवण, कर्मचा-यांची वैयक्तिक स्वच्छता त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. या उपक्रमात माहिती समाज कल्याणचे मुख्य अधिकारी देवडे साहेब यांचे सहकार्य मिळत आहे.
या उपक्रमात जिजामाता कन्या निवास, भिमा गौतमी विद्यार्थीनी वसतिगृह, संबोधी वसतिगृह, श्री संत गाडगे महाराज छात्रालय, रामकरण सारडा विद्यार्थी गृह, भगत मळा, हडको, सावेडी, संत सखुबाई मुलींचे शासकिय वसतिगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह, कै. बाजीराव पाटील सोनवणे वसतिगृह, तारकपूर बस स्टॅण्ड समोर, अहमदनगर या शाळा सहभागी झाल्या आहेत. ५०० हुन अधिक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
सदर उपक्रमास हायजिन फर्स्ट च्या सदस्य अनुराधा रेखी, विकास जाधव, बाबासाहेब शिंदे सर, आरती गिरवले मॅडम, वैशाली गांधी, आय लव्ह नगर हेड विशाखा पितळे मॅडम, प्रेम गांगुली सर, संतोष आव्हाड सर, उत्कर्षा बोरा मॅडम यांचे सहकार्य मिळत आहे.
शहरातील इतर कुठल्याही वसतिगृहामध्ये स्वच्छतेविषयी मार्गदर्शन हवे असेल तर पुढिल नंबर वर संपर्क करावा ९४२००२८२१२ असे आव्हान हाइजीन फर्स्ट च्या वतीने करण्यात आले असून नगरकरांनी आपल्या अहमदनगर शहराला प्रथम हाइजीन सिटी म्हणून ओळख मिळवून देण्याकामी आपले कर्तव्य समजून स्वतःहून पुढे यावे व हाइजीन फर्स्ट च्या उपक्रमात आपले सहभाग नोंदवावे असे देखील आव्हान हाइजीन फर्स्ट चे सभासद ईश्वर बाबूशेठ बोरा यांनी केले आहे.