*किर्तनकार, प्रवचनकार ह.भ.प. सुभराव घबक महाराज*
घबकवाडी, (ता. वाळवा) येथील सावळा विठ्ठल मंदिर येथे मंदिराच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त जगदगुरू तुकाराम महाराज यांचे वंशज वै. श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली देहूकर महाराज, श्रीगुरु बाळासाहेब देहूकर महाराज पंढरपूर यांच्या कृपा आशिर्वाद व मार्गदर्शनाखाली शनिवार, दिनांक २४/५/२०२५ ते शनिवार ३१/५/२०२५ अखेर तुकाराम गाथा पारायण सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देहूकर फड समाज दिंडी, सावळा विठ्ठल मंदीर घबकवाडी चे व्यवस्थापक, किर्तनकार, प्रवचनकार ह.भ.प. सुभराव घबक महाराज यांनी दिली.
या सात दिवस चालणाऱ्या गाथा पारायण सोहळ्यात दैनंदीन कार्यक्रम सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत किर्तनकार ह.भ.प. गुरव महाराज, गणेश महाराज, बाल किर्तकार लोहार महाराज, शिवाजी लोहार महाराज, श्रीरंग महाराज, प्रतिक महाराज, सुभराव घबक महाराज, यांची कर्तन सेवा होणार असुन बुधवार, दिनांक २८ मे रोजी वै. ह.भ.प. महादेव सावळा घबक महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सकाळी १० ते १२ यावेळेत साताराचे सुप्रसिध्द किर्तनकार ह. भ.प. शिवाजीराव भोसले सर यांचे फुलाचे किर्तन व दिनांक ३१ मे रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत सदगुरू दादामहाराज रामदाशी यांचे सप्ताह समारोप काल्याचे किर्तन होणार आहे.
व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प. सुभराव घबक महाराज, विनेकरी ह.भ.प. भाऊसो नरसु घबक, मृदुंगमनी गणेश लोहार व हरी पाटील लातुर, काकडा, हरिपाठ व किर्तनसाथ प.पु. साध्वी योगिनी प्रगायनाथ, विश्वनाथ पाटील लातुर, विष्णू महाराज लातुर, मारूती लोहार, शंकरराव कदम (आण्णा), संजय पवार स्वर साथ शिवाजी सुतार, वसंतराव कदम (दाजी), तबला वादक यशवंत घबक, किशोर विलासराव कदम, गणेश लोहार, बजरंग कदम, चोपदार बबन महाराज लातुर आदी काम पाहणार आहेत.
पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ७ ते १२ तुकाराम गाथा वाचन, किर्तन सायंकाळी ७.३० ते ९.३० असे दैनंदीन कार्यक्रमाचे आयोजन केले असुन, वाचकांना तुकाराम गाथा वाचणास उपलब्ध करुन दिली जाईल. या गाथा पारायण सोहळ्यास घबकवाडी, ओझर्डे, सुरूल, नायकलवाडी, माणीकवाडी, महादेववाडी, ढोलेवाडी, पोखर्णी, शिंगटेवाडी यांच्या सह वाळवा शिराळा तालुक्यातील भजनी मंडळे व सांप्रदायीक लोक सहभागी होणार आहेत. तरी पंचक्रोशीतील सर्व भावीक भक्तांनी या सप्ताहामध्ये तन मन धनाने सहभागी व्हावे असे अवाहन देहूकर फड समाज दिंडी, सावळा विठ्ठल मंदीराचे व्यवस्थापक, किर्तनकार, प्रवचनकार ह.भ.प. सुभराव घबक महाराज यांनी केले आहे
Post a Comment