विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी दिले निमंत्रण.
अहिल्यानगर -
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना ३१ मे रोजी श्री क्षेत्र चोंडी येथे विशेष उपस्थित राहण्याचे निमंत्रण विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी दिले आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी बुधवारी (दि.२१) नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त ३१ मे रोजी चौंडीला येण्याचे निमंत्रण दिले. यानिमित्ताने देशाच्या सर्वोच्चपदी असलेल्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या या चौंडीला येणा-या दुस-या राष्ट्रपती ठरणार आहेत. १९९६ साली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या २०१ व्या पुण्यतिथीनिमित्त देशाचे तत्कालिन राष्ट्रपती डाॅ.शंकरदयाळ शर्मा यांनी चौंडीला आले होते. त्यांनतर ३०० व्या जयंतीनिमित्त देशाच्या महिला राष्ट्रपती मुर्मु चौंडीला येत असल्याने चौंडीचे महत्व अधिक वाढणार आहे.
१५ दिवसापुर्वी ६ मे रोजी चौंडीत राज्य मंत्रीमंडळाची बैठक संपन्न झाली.या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजीत पवार यांच्यासह सर्व मंत्री,विविध विभागाचे सचिव व उच्चपदस्य अधिकारी चौंडीला उपस्थित होते. या बैठकीच्या निमित्ताने चौंडीच्या तब्बल ७०० कोटी रूपयांच्या बृहत विकास आराखड्याला राज्यसरकारने मंजुरी दिली. या आराखड्याच्या माध्यमातून स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या धर्तीवर चौंडी येथे सीना नदी पात्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा तब्बल १०८ फुट उंचीचा पुर्णाकृती पुतळा व समुह शिल्प उभारण्यात येणार आहे. याबरोबरच संग्रहालय,भक्तनिवास,अंतर्गत रस्ते सीना नदीवर बंधारे ,चौंडीला जोडणारे रस्ते अशी कामे मार्गी लागणार आहेत. तर ३१ मे रोजी जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या उपस्थित होणा-या कार्यक्रमात विविध विकास कामांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्टपतींना निमंत्रण देण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांचेसमवेत सांगली महानगर पालिकेच्या महापौर संगिता खोत, ॲड. वीणा सोनवलकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. उज्वला हाके, डॉ. स्मिता काळे, मानिका महानवर याही सहभागी झाल्या होत्या.
Post a Comment