CYDA इंडिया मार्फत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा संपन्न

 
अहिल्यानगर (प्रतिनिधी)CYDA इंडिया अर्थात Centre for Youth Development and Activities या स्वयंसेवी संस्थेचा सॉफ्ट स्किल प्रमाणपत्र वितरण समारंभ नुकताच पार पडला या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक अनिल भोंगळ हे होते. या कार्यक्रमाअंर्तगत प्रशिक्षणार्थी यांना व्यावसायिक माहिती व प्रमाणात वाटप करण्यात आहे.CYDA ही संस्था 1999 मध्ये स्थापन झालेली एक स्वयंसेवी संस्था आहे.जी 13 ते 29 वयोगटातील तरुणांना सक्षम करण्यासाठी काम करते. CYDA चा उद्देश समाजातील दुर्लक्षित लोकांना मदत करणे, विशेषतः हक्क विकासाच्या दृष्टिकोनातून युवांना सक्षम करण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवणे हा आहे.CYDA समाजातील दुर्लक्षित लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी काम करते.CYDA आपल्या कामात हक्क विकासाचा दृष्टिकोन स्वीकारते, म्हणजे लोकांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी सक्षम करते.CYDA पर्यावरण संरक्षणासाठीही कार्य करते. या संस्थेच्या वतीने 13 मे 2025 पासून 20 मे 2025 पर्यंत प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणात 25 महिला लाभार्थ्यांनी सहभाग घेतला ज्यात व्यक्तिमत्व विकास, महिला सक्षमीकरण, जीवन कौशल्य,वेळेचे व्यवस्थापन, महिला पुरुष समानता, नोकरीची पूर्वतयारी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
जीवन कौशल्य प्रशिक्षणानंतर लाभार्थ्यांमध्ये एक दृढ आत्मविश्वास निर्माण होतो व आपले मत ठामपणे सर्वांसमोर मांडण्यात महिला पुढाकार घेऊ शकतात.
समाजामध्ये जीवन जगत असताना घरात किंवा कामावर आपण प्रत्येक संघर्षाला संयमाने स्थिर विचाराने आणि विवेकी बुद्धीने सामोरे जाऊन योग्य निर्णय कसा घ्यावा याचे ज्ञान लाभार्थ्यांना अवगत होते.
लाभार्थ्यांना आर्थिक साक्षरता तसेच सोशल मीडियाचा वापर, व सायबर सुरक्षा संदर्भात माहिती अवगत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post