अहमदनगर: अहमदनगर डाक विभागातील आनंदीबाजार पोस्टऑफिसमध्ये डाक सहायक म्हणून कार्यरत असणारे श्री सागर गोरख कलगुंडे यांची नुकतीच परेल मुंबई येथे संपन्न झालेले राज्य निवड स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर निवड झाली.
डाक विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी,अधिकारी यांचे करीता पॉवरलिफ्टिंग,वेटलिफ्टिंग बॉडी बिल्डरची 2023_2024 साठी राज्य निवड चाचणी परेल येथील ओंकार फिटनेस क्लब येथे संपन्न झाली.
राज्यभरातील 48 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता, अहमदनगर डाक विभागातील श्री सागर कलगुंडे, कमलेश मिरगणे, संदीप कोकाटे,तान्हाजी सूर्यवंशी यांनी स्पर्धेत सहभाग घेतला, त्यामध्ये पॉवरलिफ्टिंग मध्ये श्री सागर कलगुंडे यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. राष्ट्रीय पातळीवर निवड होणारे अहमदनगर विभागातील श्री सागर कलगुंडे,हे एकमेव खेळाडू आहेत.
डाक विभागातील कर्मचारी अधिकारी यांच्या साठी प्रतिवर्षी अश्या स्पर्धेचे आयोजित केल्या जातात,राष्ट्रीय पातळीवर निवड होणाऱ्या स्पर्धकांना विशेष सेवा सवलती दिल्या जातात.नियमितपणे सरावा करिता सेवेतून दोन तासाची विशेष सूट दिली जाते.
राज्यभरातील श्री.दिपक गव्हाणकर, संतोष ठोंबरे अभिषेक पाटील घनश्याम देसाई,अक्षय वाळके तुषार माने,सागर कलगुंडे, गणेश जाधव,संदिप नार, सुनील मगदूम, किरण मूलमुले,वसीम शेख, आशुतोष साहा यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली.लवकरच राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन होईल त्यामध्ये हे सर्वजण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.
उर्वरित सर्व सहभागी खेळाडू यांना प्रमाणपत्र देऊन मा श्री जी एम नंदनवार यांचे हस्ते गौरविण्यात आले .
राज्य पातळीवरील निवड चाचणीचे या वर्षीचे आयोजन हे ईस्ट डिव्हिजन मुंबई यांच्याकडे होते.मा श्री जी एम नंदनवार ,श्रीमती स्नेहल दळवी,मंगेश पवार,किशोर भोसले यांच्या टीमने अतिशय सुंदर नियोजनात स्पर्धा संपन्न झाली.
श्री सागर कलगुंडे यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबदल त्यांचा विशेष गौरव श्री सुरेश बन्सोडे प्रवर अधिक्षक डाकघर अहमदनगर यांनी त्याच्या कार्यालयात केले यावेळी सहायक अधिक्षक श्री बाळासाहेब बनकर, पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव,श्री संदिप कोकाटे,बापूसाहेब तांबे, पोस्टल सोसायटीचे चेअरमन श्री नामदेव डेंगळे, यांच्या सह मोठ्या संख्येने डाक कर्मचारी उपस्थित होते.
श्री सागर कलगुंडे यांना स्वराज हेल्थ क्लबचे दिपक बारस्कर व श्री राहुल गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळाले.
श्री सागर कलगुंडे यांचे मा श्री राजेंद्र पाटील साहेब उपजिल्हाधिकारी अहमदनगर, मा श्रीमती भाग्यश्री बिले जिल्हा क्रिडा अधिकारी अहमदनगर,मा श्री सुरेंद्र गांधी नगरसेवक,श्री दिलीप दादा सातपुते शहर प्रमुख शिवसेना,यांच्यासह अनेकांनी अभिनदन केले
Post a Comment