पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त १३ ऑगस्ट रोजी आयोजीत अभिवादन समारंभास चौंढी येथे हजारोंच्या संख्यने उपस्थित रहा
*प्रदेशाध्यक्ष - मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे*
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म गांव चौंढी, ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर येथे रविवार दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजीत करण्यात आलेल्या अभिवादन समारंभास महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी केले आहे.
अभिवादन समारंभास महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे संस्थापक, मार्गर्शक मा. डॉ. आण्णासाहेब डांगे (आप्पा) हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत समारंभास माजी प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अँड. रामहरी रूपनवर यांच्यासह धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी आघाडी, सांस्कृतीक विभागाचे राज्य, जिल्हा, तालुका व स्थानीक पातळीवरील सर्व पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. तरी या राज्यव्यापी अभिवादन समारंभास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी केले आहे.
Post a Comment