नगर, दि.16- विळद (ता. नगर) शिवारात मेंढपाळांच्या पालावर रात्रीच्यावेळी दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने पकडली. या कारवाईत 5 आरोपींकडून 3 लाख 4 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून छत्रपती संभाजीनगर येथील दरोडयाचा गुन्हा उघडकीस आला आहे. दरम्यान, विळद (ता. नगर) येथील दरोड्यानंतर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना तातडीने या दरोड्यातील आरोपींना पकडण्याची सूचना केली होती.
पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बिरप्पा करमल, गणेश धोत्रे, अरूण गांगुर्डे, भगवान धुळे, गणेश लोंढे, शाहीद शेख, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, रविंद्र घुंगासे, आकाश काळे, भगवान थोरात, भाऊसाहेब काळे, सुनील मालणकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर, अरूण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा किसन उर्फ विजय गौतम काळे (रा.पानसवाडी, ता.नेवासा) याने त्याच्या साथीदारासोबत केला असून चोरीचे सोने विक्री करण्यासाठी मोटार सायकलवरून नेवासा मार्गे पांढरीपूल येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.पथकाने सापळा रचून संशयीत आरोपींचा शोध घेऊन भैय्या कडु काळे (वय 18, रा.शिरोडी, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर), ताराचंद विरूपन भोसले (वय 35, रा.गाजगाव, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर), किसन उर्फ विजय गौतम काळे (वय 23, रा.पानसवाडी, ता.नेवासा), नागेश विरूपन भोसले (वय 20, रा.गाजगाव, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर), सोनुल लक्षरी भोसले (वय 19, रा.बिडकीन, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांचे साथीदार बदाम कडू काळे (रा.शिरोडी, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर) (पसार), रघुवीर विरूपन भोसले (रा.गाजगाव, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर) (पसार), महेश नंदु काळे (रा.खोसपुरी, ता. नगर) (पसार) यांच्यासह विळद गावातील डोंगर माथ्यावर असलेल्या मेंढपाळांच्या पालावर पाच ते सहा दिवसांपुर्वी रात्रीच्या वेळी महिला व पुरूषांना मारहाण करून चोरी केल्याची माहिती सांगितली. आरोपींकडून 3 लाख 4 हजाराचा मुद्देमाल त्यात 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, चार मोबाईल व दोन मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींनी मागील 10 ते 15 दिवसापुर्वी मांजरी (ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर) येथील मेंढपाळाच्या पालावर मारहाण करून चोरी केल्याची माहिती पथकाला सांगितली.
Post a Comment