रोहित पवारांना पाचव्यांदा धोबीपछाड देत सभापती.प्रा. राम शिंदें यांनी दाखवले कर्जत जामखेड मतदारसंघात वर्चस्व



 अहिल्यानगर – कर्जत व जामखेड कृषी उत्त्पन्न बाजार समिती कर्जत नगरपंचायत, खरेदी विक्री संघ निवडणुकीनंतर पाचव्यांदा कर्जत दुध संघात आ.रोहीत पवार यांना एकही उमेदवार न मिळाल्याने संघाची निवडणुक बिनविरोध करत पाचव्यांदा रोहीत पवारांना धोबीपछाड दाखवत सभापती राम शिंदे यांनी मतदार संघातील वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले आहे. कर्जत दूध संघात आमदार पवार यांच्या गटाला उमेदवाराच न मिळाल्याने संघाची निवडणूक बिनविरोध झाली व प्रा. शिंदे यांचे समर्थक तेथे सत्तारूढ झाले आहेत.

 कर्जत तालुक्यातील सहकार महर्षी रावसाहेब उर्फ बाळासाहेब पाटील सहकारी दूध व्यवसायिक प्रक्रिया संघ मर्यादित या सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. सभापती प्रा. शिंदे यांचे समर्थक 15 संचालक त्यावर निवडले गेले. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना प्रतिस्पर्धी उमेदवार उभे करता आले नाही. कर्जत व जामखेडच्या बदलत्या राजकारणात सभापती प्रा. शिंदे यांनी आमदार पवार यांना दुसऱ्यांना मात दिली आहे. कर्जत नगरपंचायतीत आमदार पवार यांची सत्ता असताना तेथील राष्ट्रवादी शरद पवार  गटाच्या काही व काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंड केले व सभापती प्रा. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता स्थापन केली आहे. या पार्श्वभूमीवर आता बाळासाहेब पाटील सहकारी दूध संघातही सभापती शिंदे समर्थकांची सत्ता आली आहे. आमदार पवारांना हा दुसरा धक्का मानला जात आहे.



लोकाभिमुख कारभार करा- प्रा. शिंदे

सहकार महर्षी रावसाहेब उर्फ बाळासाहेब पाटील सहकारी दूध व्यवसायिक प्रक्रिया संघाच्या बिनविरोध निवड झालेल्या नवनिर्वाचित संचालकांनी शनिवारी अहिल्यानगर येथील सभापती प्रा. राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात येऊन सभापती प्रा. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी प्रा. शिंदे यांनी सर्व संचालकांचा सत्कार केला. दूध संघाचा कारभार लोकाभिमुख करा व सहकाराच्या तत्त्वाप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन संघाची प्रगती करा, असे आवाहन नव्या संचालकांना केले तसेच दूध संघाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी दूध संघाचे नवनिर्वाचित संचालक सर्वश्री मंगेश दादा जगताप, काकासाहेब धांडे, बापूसाहेब शेळके, दादासाहेब खराडे, शामराव काळे, बाळासाहेब निंबाळकर, अंकुशराव दळवी, रामजी पाटील, दत्तात्रय पाटील, शंकरराव देशमुख, दत्तात्रय तनपुरे, दादासाहेब निंबाळकर, शिवाजी काळे, बारकू काळे व दीपक ढगे या संचालकांसह भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष अनिल गदादे व माजी तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे , बापूसाहेब माने आदी मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post