पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० जयंती वर्षानिमित्त इस्लामपूर शहर व वाळवा तालुका धनगर समाज महासंघाच्या वतीने महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांच्या नेतृत्वात इस्लामपूर शहरातील प्रमुख मार्गावरुन भव्य मिरवणूक काढण्यात आली. महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा. डॉ. आण्णासाहेब डांगे, माजी जलसंपदा मंत्री, आमदार जयंतरावजी पाटील, माजी कृषी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत, शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख अभिजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पाटीचे सांगली जिल्हाध्यक्ष देवराजदादा पाटील, भाजपाचे नेते, व्यकंटेश्वरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राहुलदादा महाडीक, माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे, माजी जिल्हा परिषद सदस्य भिमराव माने, संभाजीराव कचरे, विक्रमभाऊ पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून भव्य मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.
मिरवणूक मार्गावर आउट फटाके, हालगी घुमके, घोडे उंट, ढोल वादक, भजनी मंडळे, टाळकरी, पिपाणी वाले, शिंगाडी तसेच मुख्य रथात अहिल्यादेवीचा पुतळा बसविण्यात आला होता. रथाच्या मागे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जिवनावरील पाच जिवत प्रसंग दाखविण्यात आले होते. मिरवणूकीचे स्वागत शहरातील सर्वच व्यापारी, नागरीक महिला, पुरुष यांनी केले. सहा ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने मिरवणूकीत फुलांची उधळण करण्यात आली. अनेक ठिकाणी शहरातील नागरीकांच्या वतीने पिण्याचे पाणी, चहा नाष्टाची सोय करण्यात आली होती. मिरवणूकीत ३५० पेक्षा जास्त धनगरी ढोल उत्सफुर्तपणे सहभागी झाले होते. पिवळे फेटे व पिवळ्या टोप्या परिधान करून व ढोलाच्या निनादाने शहर दुमदुमुन गेले. हजारोंच्या संखेने धनगर समाजातील महिला पिवळ्या रंगाची साडी व पुरुष पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान करून सहभागी झाले होते.
शहरात सर्वत्र मोठ मोठ्या स्वागत कमाणी व पिवळ्या रंगाचे झेंडे लावून वातावरण शुशोभित करण्यात आले होते. मिरवणूकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी, सुभेदार मल्हारराव होळकर, सुभेदार यशवंतराव होळकर, यांच्या नावाने घोषणा देण्यात येत होत्या, यळकोट यळकोट जय मल्हार या घोषणेने तरूणांच्या उत्साह संचारला होता. अत्यंत शिस्तबध्द पणे मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, वैभव पवार, अँड. धैर्यशिल पाटील, सुभाष सुर्यवंशी, जयवंत पाटील, सागर मलगुंडे, सतिष महाडीक, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, कपील ओसवाल, आयुब हवलदार, अशोकराव देसाई, महेश पाटील, अजित पाटील, प्रविण पाटील, सुमित चंद्रकांत पाटील, सचिन देसाई, मानसिंग पाटील यांच्या सह शहरातील व्यापारी व नागरकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केले.
महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांच्या सह महासंघाचे वाळवा तालुकाध्यक्ष अविनाश खरात, माजी जि.प. सदस्य संभाजीराव कचरे, प्रा. अरुण घोडके, शिवाजी बापू वाटेगांवकर, सुनिल मलगुंडे, बाळासाहेब कोळेकर, सत्यावन रासकर, अँड. उमेश कोळेकर, संदिप माने, किसन गावडे, प्रकाश कनप, बजरंग कदम, गणपती वाटेगावकर, अमोल विरकर, अभिजित रासकर, पांडूरंग वाघमोडे, चंद्रशेखर तांदळे, मंगश लवटे, उमेश गावडे, विजय कवठेकर, राजाराम गावडे, बाबासाहेब डांगे, दत्तात्रय तांदळे, तसेच सौ. पुष्पलता खरात, सौ. वैशाली राजेंद्र डांगे, सौ. सविता विश्वनाथ डांगे, सौ. साधना ताटे, अनिता डांगे, सौ. मंगल कनप, सौ. अपर्णा माने, यांच्या अनेक पदाधिकारी व महिला यांनी मिरवणूक यशस्वी करण्यासाठी अविरत परिश्रम व कष्ट घेतले. बोरगाव येथील युवक कार्यकर्ते यांनी मिरवणूक मार्गावरील सर्व स्वच्छता केली. या स्वच्छता अभियान चे कौतुक इस्लामपूर शहरासह सर्वत्र होत आहे.
Post a Comment