*इस्लामपूर येथे १५ जून रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन*
*प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे*
इस्लामपूर येथे रविवार, दिनांक १५ / ६ / २०२५ रोजी दूपारी ४:०० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती उत्सवा निमित्त इस्लामपूर शहरातील प्रमुख मार्गावरुन भव्य दिव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती राज्यभर सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत असुन इस्लामपूर शहरातील शिराळा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पासुन मिरवणूकीस प्रारंभ होणार असुन मिरवणूक मार्ग पुढील प्रमाणे : - शिराळा नाका - आण्णासाहेब डांगे चौक - गणेश भाजी मंडई - लाल चौक - गांधी चौक - यल्लामा चौक - तहसिलदार कार्यालय - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा - महावीर चौक - एक नंबर शाळा - शिवाजी चौक येथे या मिरवणूकीचा समारोप होणार आहे.
मिरवणूकीच्या नियोजन व तयारीसाठी आज शहरातील मा. श्री. आण्णासाहेब डांगे इंटरनॅशनल स्कुल येथे शहरासह तालुक्यातील धनगर समाज बांधवांची व्यापक बैठक संपन्न झाली. स्वागत व प्रास्तावीक वाळवा तालुकाध्यक्ष श्री. अविनाश खरात यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. अरुण घोडके, श्री. शिवाजी बापू वाटेगांवकर, सुनिल मालगुंडे, बाळासाहेब कोळेकर, प्रकाश कनप, किसन गावडे, चंद्रशेखर तांदळे, शिवाजी कोळेकर, अभिजीत रासकर, जयकुमार माने, मदन रासकर, विलास गावडे, भानुदास मोठे यांनी मनोगते व्यक्त करून मिरवणूक मोठ्या दिमाखात व जंगी स्वरूपात करण्याचे आवाहन केले.
यावेळी अमोल विरकर, मानव गवंडी, भानुदास बिरकर, सत्यवान रासकर, संताजी गावडे, अविनाश वाटेगावकर, शरद कोळेकर, जयवंत टिबे, विश्वास रासकर, बाबासाहेब डांगे, संदीप सलगर, रामचंद्र गावडे, महादेव शिद, पंढरीनाथ कोळेकर, धोंडीराम वाटेगावकर, सर्जेराव फसाले, धोंडीराम वाटेगांवकर, हणमंत होनमाने, विठ्ठल गावडे, दत्तात्रय तांदळे, संभाजी विरकर, विलास गावडे, प्रा. भगवान बोते, धनाजी गावडे, संजय तांदळे, जगन्नाथ भिसे, पोपट काळे, महादेव वाघमोडे यांच्या वाळवा तालुका व इस्लामपूर शहरातील धनगर समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे संयोजन उमेश गावडे, विजय कवठेकर, मंगेश लवटे यांनी केले. सुत्रसंचालन बजरंग कदम यांनी केले. शेवटी आभार सुनिल मलगुंडे यांनी मानले.
गुरूवार दिनांक ५/६/२०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता इस्लामपूर बसस्थानक नजिक बालाजी कॉम्प्लेक्स येथे तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष श्री. अविनाश खरात यांनी केले आहे.
Post a Comment