चंद्रकांत उर्फ काका शेळके यांची ओबीसी व्ही.जे.एन.टी. शिवसेना सेल अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड
नगर - शिवसेना पक्षाचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने व शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी व्हि.जे.एन.टी.सेना अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याच्या अध्यक्षपदी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे धडाडीचे नेते चंद्रकांत उर्फ काका शेळके यांची निवड करण्यात आली. पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, अहिल्यानगर शहर या कार्यक्षेत्रासाठी ओबीसी व्ही. जे. एन. टी. अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या हस्ते शिर्डी येथे झालेल्या ओबीसी व्ही. जे. एन. टी. शिवसेना सेलच्या मेळाव्यामध्ये देण्यात आले. यावेळी कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष महिला मराठवाडा प्रमुख मुंडे ताई, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, उत्तर जिल्हा प्रमुख प्रदीपराज भोंडे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांत शेळके हे गेली दहा ते पंधरा वर्षापासून अहिल्यानगर शहरामध्ये सामाजिक कामामध्ये अग्रेसर असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदत कक्षाच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्यातील अनेक रुग्णांना मदत मिळवून दिली आहे. सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याकारणाने पक्षाच्या वतीने त्यांची या पदी निवड करण्यात आली असल्याचं यावेळी सांगण्यात आले.
Post a Comment