25 वर्षांनंतर विद्यार्थी पुन्हा त्याच वर्गात ; रेसिडेन्शिअल हायस्कुलच्या इ.10 वी 1998-99 च्या माजी विद्यार्थ्यांची भरली शाळा शाळेने फक्त पुस्तके ज्ञान दिल नाही तर जीवन जगण्याची खरी शिदोरी दिली - माजी प्राचार्य विजय पोकळे
25 वर्षांनंतर विद्यार्थी पुन्हा त्याच वर्गात ;
रेसिडेन्शिअल हायस्कुलच्या इ.10 वी 1998-99 च्या माजी विद्यार्थ्यांची भरली शाळा
शाळेने फक्त पुस्तके ज्ञान दिल नाही तर जीवन जगण्याची खरी शिदोरी दिली - माजी प्राचार्य विजय पोकळे
नगर - 25 वर्षांपूर्वी आपण या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं आणि आपापल्या जीवनात पुढे निघून गेले. पण आज, त्या सर्व आठवणींना उजाळा देण्यासाठी, पुन्हा एकदा आपण आपल्या लाडक्या शाळेत एकत्र आले आहेत - जणू काही काळ थांबलेला आहे. या शाळेने विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञानच दिलं नाही, तर जीवन जगण्याची खरी शिदोरी दिली. शिक्षकांनी दिलेले संस्कार, मित्रांबरोबर घालवलेले क्षण, वर्गातले खोडकर किस्से - हे सगळं आजही ताजं वाटतं. आज पुन्हा एकदा तोच वर्ग, तीच घंटा, तीच ओळखीची इमारत पाहून काळजाला हुरहूर लागते. आपल्यातील काहीजण नगरवेक, पोलिस अधिकारी, डॉक्टर झाले, वकील, अभियंते, इंजिनिअर, मेडिकल ऑफिसर, शिक्षक तर उद्योजक पण आपली ओळख कायम शाळेच्या विद्यार्थ्याचीच राहणार, असे प्रतिपादन माजी प्राचार्य विजय पोकळे यांनी केले.
25 वर्षांपूर्वी शाळा पूर्ण करून आपापल्या मार्गाने गेलेले इ.10 वीच्या 1998 -99 बॅचच्या माजी विद्यार्थी पुन्हा एकदा रेसिडेन्शिअल हायस्कुल शाळेत एकत्र जमले. या पुनर्भेट कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देताना सर्वांचे डोळे पाणावले पंचवीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळा गाजवली.
1998 साली ज्या पद्धतीने शाळेचा दिनक्रम असायचा त्याच पद्धतीने आज माजी विद्यार्थ्यांचा शाळा भरली होती. शाळेच्या वर्गात आकर्षक रांगोळी काढण्यात आली. वर्गाला आकर्षक सजावट करण्यात आली. पहिले ज्या बेंचवर बसत होते त्याच बेंचवर माजी विद्यार्थी बसले. सर्व विद्यार्थ्यांनी फेटे परिधान करून वर्गात आले होते. 125 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. 30 शिक्षकांचा स्टाफ उपस्थित होता. सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा देत होते. आपण कोणत्या बेंचवर बसायचो आणि काय काय करायचो. कशी पद्धतीने मज्जा करायचं हे सर्वजण सांगत होते.
यावेळी शिक्षकांचे स्वागत पुष्पवृष्टी करून करण्यात आले. या स्वागताने शिक्षकही भारावून गेले. विद्यार्थ्यांनी ढोलीबाजाच्या तालात नृत्य केले. मधली सुट्टीत शाळेच्या प्रतिकृतीचा केक कापण्यात आला. यावेळी मिष्ठान्न भोजनाचा सर्वांनी अस्वाद घेतला.
माजी विद्यार्थी आज राज्यात सर्वत्र आपला यशस्वी कारभार करत आहे. आज या शाळेत चेन्नई, सुरत, भुसावळ, संभाजीनगर, नाशिक, धुळे आदी विविध भागातून विद्यार्थी आले होते. काही विद्यार्थी परदेशात असल्याने ते ऑनलाईन सहभागी होऊन आनंद घेत होते. शेवटी निरोपाची वेळ झाली तेव्हा सर्वांना आपले अश्रू अनावर झाले होते. अप्रतिम झालेल्या या सोहळ्याचे मात्र चर्चा दूरपर्यंत रंगली होती.
प्रास्ताविक गणेश मिसाळ व किरण लोहकरे यांनी केले. यावेळी ते म्हणाले पुन्हा एकदा शाळा आपली भरली पाहिजे या उद्देशाने 1998-99 बॅचच्या विद्यार्थ्यांची शाळा भरवली. पुन्हा एकदा शाळेमध्ये जाता यावे... पुन्हा एकदा त्या बेंचवर बसता यावे... याचसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्याम आप्पा नळकंडे, किरण लोहकरे, आसिफ खान, अनुरथ कोळेकर, सागर बडे, सरफराज शेख आदींनी परिश्रम घेतले होते.
तसेच या कार्यक्रमास अनुरथ कोळेकर, अमित केदारी, डॉ.बरखा पार्चे, हर्षाली काळे, राहुल भोसले, अमोल म्हस्के, अजय बर्हाटे, गजानन बोदवडे, डॉ.माया लहारे, स्मिता भोईटे, गंगाधर वारुळे, वसिम शेख, रेणुका वाकळे, सुजाता वाकळे, दिपमाला सातपुते, संजय वाकळे, राहुल मापारी, अमोल शेठे, शबाला शेख, संजय भागवत, रोहिणी वाघ, प्र्रविण कणसे, विशाल टकले, बबलु शेख, महेश भवार, गायत्री गवळी, बबन शिंदे, राहुल राऊत, संदिप उरमुडे, गणपत ठोंबळ, शितल झावरे, सागर बडे, निलेश व्यवहारे, अमित खांडेकर, ज्ञानेश्वर नेहुल, श्रीनाथ शिंदे, रवि सुपेकर, अमोल गुंड, अर्चना भगत, आनंद लहामगे, मोहन खडामकर, उलका दिंडे, धनश्री महाडुंळे, अश्विन साळुंके, राहुल दळवी, हेमंत दलिंद्रे, रविंद्र बुधवंत, योगेश कोतकर, कमलेश खंडेलवाल, ज्योती दिवटे, महेश दारकुंडे, संतोष गवळी, निझाम काझी, गणेश सानप,चंद्रशेखर भंडारी, नितीन वाखुरे, अशोक सोनवणे, नंदु हांडे, महेश वैद्य, जावेद शेख आदी विद्यार्थी तर शिक्षकांमध्ये राजेंद्र लांडे, सुनिता शिदोरे, प्रा.एल.बी.म्हस्के, प्रमिला दिघे, मनोहर शिंदे, मंगल तवले, विजय कुमार बोरकर, प्रमिला लगड, नामदेव दहातोंडे, दत्तराज सोनावळे, पद्मा पठारे, सरस्वती आठरे, मिनाक्षी मोरे, भास्कर गोरे, विजया शिंदे, तात्यासाहेब दरेकर, सुरेखा जाधव, आशाताई गाडे, किसनराव तवले, नवनाथ आमले, मधुकर विटणकर, सुमती आकोलकर, हुसेन शेख, शमीम शेख आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम आप्पा नळकांडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन माया लहारे यांनी मानले.
Post a Comment