महिलांचा सन्मान करणे आपले कर्तव्य - शिवसेना संपर्क प्रमुख दिलीप सातपुते

महिला दिनानिमित्ताने शहर शिवसेनेच्यावतीने महिलांचा साडी व मिठाई देऊन सन्मान महिलांचा सन्मान करणे आपले कर्तव्य - शिवसेना संपर्क प्रमुख दिलीप सातपुते नगर - गेल्या वीस वर्षांपासून शहर शिवसेनेतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत वंचित तसेच दुर्बल घटकातील महिलांचा व महानगरपालिकेतील आरोग्य विभागात कार्यरत असणार्या महिला स्वच्छता कर्मचार्यांचा साडी व मिठाई देऊन येथे सन्मान केला जातो. समाजामध्ये या स्वच्छता महिला कर्मचार्यांचा स्थान मोठे आहे या महिला कर्मचार्यांमुळेच शहराची स्वच्छता राखली जाते. आजही अनेक महिलांनी आपल्या कार्यकर्तृत्वावर समाजामध्ये एक वेगळा ठसा उमटवण्याचे काम केले आहे. या महिलांचा सन्मान करणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षाचे (शिंदे गट) संपर्कप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्त अहिल्यानगर शहरातील केडगाव मध्ये शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील दुर्बल घटकातील महिला व महानगरपालिकेतील आरोग्य विभागात कार्यरत असणार्या महिला स्वच्छता कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहर शिवसेनेचे संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, ओमकार सातपुते यांच्यासह कल्याणी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते. --------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post