महिलांच्या उन्नत्तीसाठी महिलांनीच पुढाकार घेण्याची गरज - प्रफुल्लता काकडे
श्री संत नामदेव महिला मंडळाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांचा सन्मान
महिलांच्या उन्नत्तीसाठी महिलांनीच पुढाकार घेण्याची गरज
- प्रफुल्लता काकडे
नगर - प्रत्येक कुटूंबाचा सर्वात महत्वाचा आधार ही महिला असते. कुटूंबाला एका धाग्यात गुंफण्याचे काम महिला करत असतात. सर्वांच्या आरोग्य बरोबरच सर्वांगिण विकासाची काळजी घेणारी महिला असते. परंतु स्वत:कडे तिचे लक्ष नसते. आपले आरोग्य, छंदाला मुरड घालत कुटूंब हेच तिचे विश्व असते. परंतु महिलांनी स्वत:कडे लक्ष देणे गरजेचे आहे, आपले आरोग्य चांगले असेल तर कुटूंब निरोगी राहू शकते हे लक्षात घेतले पाहिजे. महिलांनी महिलांच्या उन्नत्तीसाठी पुढकार घेण्याची गरज आहे. आज सन्मान झालेले व्यक्तीमत्व हे समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचा त्याग आणि सांभाळलेल्या जबाबदारी ही कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रफुल्लता काकडे यांनी केले.
सावेडी, शिंदे मळा येथील श्री संत नामदेव महिला मंडळाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ट्रस्टच्या अध्यक्षा प्रमिला दुमाटे, महिला मंडळाच्या अध्यक्ष प्रफुल्लता काकडे, सचिव राजश्री धोकटे, उपाध्यक्षा निर्मला लोळगे, कार्याध्यक्षा सुवर्णा भस्मे, जयश्री नेवासकर, कल्पना हेंद्रे,मनिषा लोळगे, सुजता नेवासकर, हेमा वडे, एैश्वर्या चौकटे, पुष्पा मेहेंद्रकर, लक्ष्मी सातपुते, वर्षा काकडे, दिपाली काकडे, अर्चना कल्याणकर, पल्लवी उरणकर, रेखा माळवदे, स्वाती औसरकर, सौ.बाचल, सौ.मंगल अस्वले, अनिता वनारसे, लक्ष्मी खोडके, प्राजु लोळगे, श्रुती लोळगे, प्रयागा माळवदे, वैशाली भस्मे, राजश्री माळवदे, मंगल होमकर, आरती हेंद्रे, शुभांगी सातपुते, आशा वडे, लक्ष्मी पाटकुले, पुष्पा उरणकर आदि उपस्थित होते.
यावेळी प्रमिला दुमाटे म्हणाल्या, संत नामदेव महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांच्या उन्नत्तीसाठी विविध उपक्रम नेहमीच राबविले जातात. महिला दिनानिमित्त समाजातील आदर्श व्यक्तीमत्वांचा सन्मान करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. महिलांच्या उन्नत्तीसाठी महिला मंडळाचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्रीमती कमल पांडूरंग कल्याणकर यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर सौ.कमल अर्जुनराव काकडे यांना प्रेरणादायी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी चि.ओंकार किरण उरणकर यांची इस्त्रो संस्थेत नोकरीसाठी निवड झाल्याबद्दल यावेळी सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक जयश्री नेवासकर यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री धोकटे यांनी केले तर आभार निर्मला लोळगे यांनी मानले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
--------

Post a Comment