भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महिला दिन संपन्न भाग्योदय विद्यालयाने सफाई सेविकांचा केलेला सत्कार त्सुत्य उपक्रम - उपायुक्त प्रियंका शिंदे
नगर - महिला दिनानिमित्ताने भाग्योदय विद्यालयाने केडगाव सफाई सेविकांचा केलेला सत्कार कार्यक्रम खूप त्सुत्य उपक्रम राबविला. शाळेतील मुलींचा सत्कार शाळेतील मुलांनी करायचा आणि मुलींनी जिद्दीने उभे राहायचे. महिलांचा सन्मान फक्त आजच्या दिवशी करायचा नाही तर वर्षभर आपली आई बहिण मैत्रीण यांचा सन्मान करायचा प्रत्येक काम लहान किंवा मोठे नसते. भाग्योदय ने केडगाव सफाई कामगारांचा सन्मान केला ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मुलींनी शिक्षण घेऊन माझ्यासारखे अधिकारी होण्याची इच्छा बाळगावी. क्रीडा क्षेत्र सामाजिक क्षेत्र उद्योग क्षेत्र इतर क्षेत्रात आपला ठसा उमठावा. यासाठी मुलींनी संयमाने राहावे व फेसबुक, इंस्टाग्राम यांचे वापर कमी करावा, असे प्रतिपादन अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रियंका शिंदे यांनी केले.
भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महिला दिनाचे औचित्याने केडगांव येथील सफाई महिला सेवकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अहिल्यानगर महापालिका उपायुक्त श्रीमती प्रियंका शिंदे, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, मुख्याध्यापक बन्सी नरवडे, कोतकर बाबासाहेब, गोविंद कदम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती केरुळकर मॅडम यांनी सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, जिजामाता, मदर टेरेसा ,इंदिरा गांधी या महिला व्यक्तिमत्त्वांचा आर्दश मांडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानदेव बेरड यांनी आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. विद्येसाठी आपण सरस्वतीची पूजा करतो. धनप्राप्तीसाठी आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो. अशी आपली भारतीय संस्कृती आहे कुठल्याही आर्थिक परिस्थिती चांगली नसताना केवळ जिद्दीच्या बळावर अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपायुक्त पदावर काम करणार्या प्रियंका ताई शिंदे यांचा मुलींनी आदर्श घ्यावा. प्राचीन काळी चूल आणि मूल या पलीकडे महिलांचे जीवन नव्हते. सतीची चाल, बाल विवाह आशा रुढीपरंपरा होत्या. परंतु महात्मा फुले,महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणाच्या उद्धाराचे काम केले. महिलांना समाजात मानाचे स्थान दिले.
कार्यक्रमाचे आभार गोविंद कदम यांनी केले तर सूत्रसंचालन दत्तात्रय पांडुळे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोपान तोडमल, साहेबराव कार्ले, धनंजय बारगळ, संतोष काकडे, रुपाली शिंदे, रेणुका गुंड,कांडेकर गोरक्ष, एकनाथ होले तसेच गणेश गायकवाड, सुधाकर गायकवाड, बाळू कावरे यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी विद्यालयातील महिला शिक्षकांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
--------

Post a Comment