क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमीत्त महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्राजक्ता कुलकर्णी यांचा बेबीताई गायकवाड यांनी केला सन्मान



क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमीत्त महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल  प्राजक्ता कुलकर्णी यांचा बेबीताई गायकवाड यांनी केला सन्मान

     नगर - महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागा मार्फत देण्यात येणारे सन 2022-23 वर्षासाठीचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाले असून अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेच्या डॉ.प्राजक्ता गिरीश कुलकर्णी यांची नाशिक विभागातून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

     क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमीत्त महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार  स्नेहालयाच्या संस्थापक कार्यकर्ता प्राजक्ता गिरीश कुलकर्णी यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या प्रोफेसर कॉलनी येथील निवासस्थानी जाऊन सामाजिक कार्यकत्यी बेबीताई गायकवाड यांनी केला सन्मान केला.

     यावेळी बोलतांना बेबीताई गायकवाड म्हणाले की, प्रत्येकाच्या जीवन जगण्याचे मार्ग, पैलु भिन्न भिन्न असतात समाजातील बहूतांशी लोक रुळलेल्या वाटेवरून चालतात आणि आपले जीवन संपवतात पण काही लोक, इतके जिद्दी, निश्‍चयी आणि धैर्यशील असतात कि ते जुन्या वाटा मोडून काढतात आणि नवीन वाटा तयार करतात, त्यामुळे संकटे निर्माण होणार्‍या अडचणी यावरही ते मात करतात. हीच माणसे इतिहासात आपला वेगळाच ठसा उमटवातात. असाच ठसा उमटवाणारे दाम्पत्य म्हणजे आधुनिक काळात हजारो अनाथांची मायबाप आणि पिडित शोषित् महिलांना न्याय मिळवून देणार दाम्पत्य म्हणजे प्राजक्ता व गिरीश कुलकर्णी यांचा असे सन्मान करताना असे उद्गार काढले.

--------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post