श्री संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज बिजोत्सवानिमित्त कुलवंतवाणी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने दि.10 ते दि.17 मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

 


श्री संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज बिजोत्सवानिमित्त कुलवंतवाणी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने दि.10 ते दि.17 मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

     नगर - शेंगागल्ली, गंजबाजार,  अहिल्यानगर येथे श्री संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज बिजोत्सवानिमित्त कुलवंतवाणी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने दि.10 ते दि.17 मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कुलवंतवाणी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टेचे अध्यक्ष व विश्‍वस्तांच्या वतीने देण्यात आली.

     या सप्ताहाचा शुभारंभ दि.10 मार्च 2025 रोजी स.7 वा. अविनाशशेठ नामदेवराव पांडोळे व सौ.वैशालीताई अविनाशशेठ पांडोळे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुख्मिणीची महापुजेने होईल. तसेच गाथा पारायण व्यासपीठ श्री.ह.भ.प.विनायक महाराज काळे, अहिल्यानगर होणार आहे. या सप्ताहात सोमवार दि. 10 मार्च 2015 रोजी राधाकृष्ण रेणुका महिला भजनी मंडळ, सारसनगर अहिल्यानगर यांचा भजनाचा कार्यक्रम, सायं.6 ते 8 वा. ह.भ.प.राजेंद्र महाराज शहाणे यांचे किर्तन, मंगळवार दि. 11 रोजी दु.3.30 ते दु.5 पर्यंत महालक्ष्मी महिला भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, सायं.6 ते 8 वा. भागवताचार्य ह.भ.प.रेणुकाताई सुसे यांचे किर्तन, बुधवार दि.12 रोजी दु.3.30 ते दु.5 पर्यंत रेणुका महिला भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, सायं.6 ते 8 वा. ह.भ.प. हरिभक्त भारुड सम्राट बाबासाहेब गोलांडे (वाकोडी) यांचे किर्तन, गुरुवार दि.13 रोजी दु.3.30 ते दु.5 पर्यंत बालाजी महिला भजनी मंडळ  यांचा भजनाचा कार्यक्रम, सायं.6 ते 8 वा. ह.भ.प.डॉ.चंद्रकांत महाराज पंधरकर पिंपळगांव यांचे किर्तन, शुक्रवार दि.14 रोजी जनाई महिला भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, सायं.6 ते 8 वा. ह.भ.प.सईताई महाराज सगळे यांचे किर्तन. शनिवार दि.15 रोजी ज्ञानमाऊली महिला भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, सायं.6 ते 8 वा. निरपेक्ष किर्तनकार ह.भ.प. मगर महाराज वाळकी यांचे किर्तन. वैकुंठ गमनाचे किर्तन रविवार दि.16 रोजी स.10 ते दु.12 पर्यंत ह.भ.प.वैशालीताई शेंडे (पिंपळनेर) यांचे होईल. दुपारी 12 ते 1 शोभा यात्रा, गं.भा.कुसुमताई नामदेवराव पांडोळे यांच्या स्मरणार्थ अविनाशशेठ नामदेवराव पांडोळे व सौ.वैशालीताई अविनाशेठ पांडोळे यांच्या सहकार्याने महाप्रसाद सेवा होणार आहे.

     कल्याचे किर्तन सोमवार दि.17 रोजी सकाळी 10 ते 12 वा. युवा किर्तनकार ह.भ.प.गणेश महाराज शेंडे (अध्यक्ष निळोबाराय वारकरी शिक्षण संस्था, पिंपळनेर) यांचे होईल. काल्याचा महाप्रसाद सोमवार दि.17 रोजी दु.1 ते 3 वा.कुलवंत वाणी समाज विठ्ठल, ट्रस्ट शेंगागल्ली, गंजबाजार, अहिल्यानगर येथे होणार आहे. या सप्ताहात टाळकरी व किर्तन साथ ह.भ.प.गणेश महाराज शेंडे (अध्यक्ष निळोबाराय वारकरी शिक्षण संस्था, पिंपळनेर) यांचे मिळणार आहे. चोपदार ह.भ.प.अनारसे मामा (सारसनगर) असणार आहेत.

          -------- 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post