सावित्रीबाई फुले यांचे कार्य मानव जातीला भूषणावह-रोहिणी बनकर

सावित्रीबाई फुले यांचे कार्य मानव जातीला भूषणावह-रोहिणी बनकर बारा बलुतेदार महासंघातर्फे सावित्रीबाई फुले स्मृतिदिनी अभिवादन नगर - महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले होत्या. मुलींसाठी पहिली शाळा त्यांनी काढली. एक मुलगी शिकली तर कुटुंब शेती या उद्देशाने त्यांनी शाळा काढून मुलींना शिकविण्याची व्यवस्था केली. महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला. अस्पृश्यांच्या हक्कासाठी लढण्याचे काम केल्याने त्या लढल्या म्हणून आम्ही घडलो अस आज महिला ताठ मानेने सांगतात. सावित्रीबाई फुले यांचे कार्य मानव जातीला भूषणावाह आहे, असे प्रतिपादन महिला जिल्हाध्यक्षा रोहिणी बनकर यांनी केले. सावेडी उपनगरात बारा बलुतेदार महासंघातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा रोहिणीताई बनकर, जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, पदाधिकारी अंबादास गारुडकर, अनिल निकम, सुनिता पुंड, मच्छिंद्र बनकर, ज्ञानेश्वर कविटकर, चंद्रकांत पुंड, विजय पानमळकर, शैलेश धोकटे, लवेश गोंधळे, दत्तू खंडागळे, राजहंस देसाई, सुरेश चुटके, बबलू कोल्हे, संदीप घुले, आदिनाथ गायकवाड, मल्हारी गीते कार्यकर्तेउपस्थित होते. यावेळी माऊली गायकवाड म्हणाले की, सावित्रीबाईंनी खर्या अर्थाने महिलांना स्वातंत्र्य मिळवून दिले. स्त्री शिक्षणासाठी सामाजिक बंधने असताना त्यांनी अवघ्या नऊ मुली घेऊन शाळा सुरू केली. महिला शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल 1852 मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने फुले दांपत्याला सावित्रीबाईंच्या सन्मानार्थ टपाल तिकीट देऊन गौरवले होते. अनिल इवळे, अनिल निकम, अंबादास गारुडकर आदींनी आपल्या मनोगता मधून फुले दांपत्याच्या कार्याचा आढावा घेतला. --------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post