माय फोन’ या मोबाईल दालनाचा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ

स्मार्ट टेक्नॉलॉजीतील सर्व प्रोडक्ट्स एकाच छताखाली मिळणार - आ.संग्राम जगताप नगर - आज सर्वत्र डिजिटल वर्ल्ड होत चाललेल आहे. टेक्नॉलॉजीचा लोकांनी आपल्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे उपयोग करून घेत आहेत. अनेक सिक्युरिटी साठी, तसेच व्यवसायात नवनवीन गोष्टींसाठी मोबाईल कंपनी नवे नवे तंत्रज्ञान आपल्याला देत आहेत. माय फोन या नवीन मोबाईलच्या दालनात अहिल्यानगरकरांना चांगली सुविधा मिळेल.मोबाइलच्या दुनियेत रोज नवनवे तंत्रज्ञान अपडेट होत असतात. जसे स्मार्ट वर्ल्ड मध्ये अनेक विविध प्रॉडक्ट्स एकाच छताखाली असते तसेच स्मार्ट टेक्नॉलॉजीतील सर्व प्रोडक्ट्स एकाच छताखाली आणण्याचे काम माय फोन टीमने केले आहे, असे आमदार संग्राम जगताप यांनी केले. अहिल्यानगर मधील टिळक रोड, वाडीयापार्क येथील ‘माय फोन’ या मोबाईल दालनाचा भव्य उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला.यावेळी अ‍ॅड. महेश तवले, संचालक अभिजित शहा ,अमित सोमाणी, अ‍ॅड.सुदाम वाडेकर, किशोर पटेल, यांची उपस्थिती होते. यावेळी माय फोनचे संचालक अभिजीत शहा म्हणाले की, माय फोन या दालनात आपल्या सर्व कंपनीच्या मोबाईल मिळतील. नवीन मोबाईल घेताना अनेकजणांना कुठला मोबाईल घ्यावा, यात गुंतून जातात, परंतु या नवीन दानलात आपल्याला प्रत्येक मोबाईलची व्यवस्थित माहिती देण्यात येणार आहे. मोबाईलचे फायदे तसेच त्या मोबाईल मध्ये कोणते नवीन फिचरबद्दल व व्यवसायात तसेच स्मार्ट डिजिटल जगात असलेल्या सर्व नवीन टेक्नॉलॉजी यासंदर्भात व्यवस्थित माहिती देऊन मोबाईल देण्यात येणार आहे. त्यामुळे या माय फोन मोबाईल दालनात अहिल्यानगरकरांनी अवश्य एकदा भेट द्यावी. यावेळी अ‍ॅड. महेश तवले म्हणाले की, आज जगामध्ये डिजिटल युगात मोठी क्रांती पाहायला मिळतात. मोबाईलमुळे आपले अनेक कामे लवकरात लवकर मार्गी लागत आहे. आपल्या हातात असणारा मोबाईल हा चांगल्या कंपनीचा आणि जगात चालणाऱ्या प्रत्येक टेक्नॉलॉजी त्यामध्ये उपलब्ध असावेत, यासाठी माय फोन या दालनाचे अहिल्यानगर शहरात शुभारंभ करण्यात आला. या दालनात एकच छताखाली अनेक कंपन्यांचे मोबाईल नगरकरांना मिळणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post