महिलादिनी सन्मानार्थ जबाबदारी देत रोहिणी बनकर यांची बारा बलुतेदार महिला जिल्हाध्यक्षपदी निवड
महिलादिनी सन्मानार्थ जबाबदारी देत रोहिणी बनकर यांची बारा बलुतेदार महिला जिल्हाध्यक्षपदी निवड
नगर - महाराष्ट्र प्रदेश 12 बलुतेदार महासंघाचे प्रांत अध्यक्ष श्री कल्याण दळे साहेब यांच्या सूचनेनुसार जागतिक महिला दिनाच्या सन्मानार्थ संघात एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून रोहिणी बनकर यांची महाराष्ट्र प्रदेश बारा बलुतेदार महासंघ महिला जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर झाली.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांचे हस्ते रोहिणी बनकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी कार्याध्यक्ष अनिल इवळे, सचिव मच्छिंद्र बनकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब कोल्हे, ज्ञानेश्वर कविटकर, चंद्रकांत पुंड, सुधीर पुंड, ज्ञानेश्वर दळवी, राजहंस देसाई, सुरेश चुटके, संदीप घुले, मल्हारी गीते, आदिनाथ गायकवाड, बबलू कोल्हे, लवेश गोंधळे, दत्तू खंडागळे सागर कोल्हे, किशोर नांदूरकर पदाधिकारी कार्यकर्तेउपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना सौ. बनकर म्हणाल्या सामाजिक प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे कष्ट आणि त्याग याची आठवण करून देणारा हा दिवस आहे. आजच्या दिवशी माझी महाराष्ट्र प्रदेश महिला जिल्हाध्यक्षपदी निवड प्रांत अध्यक्ष कल्याण दळे यांनी करून जो सन्मान दाखविला तो कधीच विसरता येणार नाही. माझ्या कार्यातून महिलांचे सक्षमीकरण करून संघटना वाढीसाठी प्रयत्न करीन. जास्तीत जास्त महिला संघटनेमध्ये जोडून सामाजिक कार्य करीत राहणार अशी ग्वाही त्यांनी दिली.
जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड म्हणाले की,महिला दिन हा सन्मान, सशक्तिकरण आणि समतेचा उत्सव असतो. आपल्या संघटनेत देखील महिलांना समान संधी देण्याचा प्रयत्न असतो. राष्ट्राच्या उभारणीत महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्याप्रमाणे आपल्या बारा बलुतेदार महासंघात देखील पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्यामुळे श्री.दळे साहेबांनी आजच्या दिवशी महत्त्वाची जबाबदारी रोहिणीताईंना देत महिला दिनाचा उत्सव खर्या अर्थाने साजरा केला.
शेवटी अनिल इवळे यांनी सर्वांचे आभार मानले.
--------
Post a Comment