भिंगार काँग्रेस कमिटीच्यावतीने खा. निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

भिंगार काँग्रेस कमिटीच्यावतीने खा. निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार खा.निलेश लंके हे सर्वसामान्य माणसाचे आधारस्तंभ -सागर चाबुकस्वार नगर - खा.निलेश लंके साहेब यांनी कोविड काळात सर्वसामान्य माणसाला जो आधार दिला हे त्यांचे कार्य कोणालाही न विसरता येणारे कार्य आहे.म्हणुनच ते सर्वसामान्य माणसांचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात.व प्रत्येक वेळी त्यांना मोबाइल वर कोणत्याही कामासाठी फोन केला तर ते सर्वसामान्य माणसांच्या अडचणी समजून घेतात, असे प्रतिपादन भिंगार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी केले. अहिल्यानगर दक्षिण चे लोकनेते लोकप्रिय खासदार निलेश लंके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार भिंगार शहर काँग्रेस कमिटी तर्फे नुकताच हंगा, पारनेर या ठिकाणी करण्यात आला. यावेळी भिंगार शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष सागर चाबुकस्वार, दिलीप माळगे, रामकिसन बाबर, पोपटराव शेंडे, रमेश नागपुरे, सचिन नवगिरे, ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब भिंगारदिवे आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना चाबुकस्वार म्हणाले की, मागच्या महिन्यात तहसीलदार ऑफिस अहिल्यानगर मध्ये जो जातीच्या दाखल्यासाठी जो सावळा गोंधळ चालु होता. त्याठिकाणी तहसीलदार,नायब तहसीलदार हे महत्त्वाचे अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते . सर्व सामान्य माणसाला सही साठी दोन ते अडीच तास ताटकळत बसावे लागले होते.खासदार साहेबांना भिंगार शहर काँग्रेस चे अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी संपर्क केल्यानंतर ते काम फक्त दहा मिनिटात झाले, असे ते म्हणाले. यावेळी चाबुकस्वार यांनी खासदार साहेब यांचे आभार मानले होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब भिंगारदिवे यांनी केले तर आभार दिलीप माळगे यांनी मानले --------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post