शाळांच्या परीक्षा 12 एप्रिलपर्यंत घ्या - सुनिल गाडगे शिक्षक भारती संघटनेची मागणी
शाळांच्या परीक्षा 12 एप्रिलपर्यंत घ्या - सुनिल गाडगे
शिक्षक भारती संघटनेची मागणी
नगर - शासनाने इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा यंदा मार्चऐवजी 8 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत घेण्याचे आदेश जारी केले. परीक्षा उशिरा होणार असल्याने मुलांचे सुट्टीत बाहेरगावी जाण्याचे शिक्षक व मुख्याध्यापकांनी केलेले परीक्षेचे नियोजन बिघडले आहे. त्यामुळे आता 12 एप्रिलपर्यंत शासनाने परीक्षा आटोपावी, असे शिक्षक भारती संघटनेच्यावतीने शिक्षण मंत्री दादा भुसे यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले असल्यची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली.
इयत्ता पहिली ते नववीच्या दरवर्षी मार्च महिन्यात परीक्षा सुरू होऊन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संपतात. यंदा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने शिक्षण आयुक्तांकडे 8 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत परीक्षा घ्याव्यात, असे वेळापत्रक दिले. निपुण भारतची देखील कार्यवाही करावी, शासन निर्णय लगोलग जारी झाला.
प्रत्येक वर्षी 10 ते 12 एप्रिलपर्यंत परीक्षा संपते. त्यानंतर उत्तरपत्रिका तपासण्यासोबत इतरही शैक्षणिक कामे असतात. त्यामुळे आम्ही शासनाला 8 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीत परीक्षा पूर्ण कराव्यात अशी मागणी केली असल्याचे शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे जिल्हा सचिव विजय कराळे, जिल्हा महिला अध्यक्ष आशा मगर कार्यवाह संजय भुसारी, शेवगाव तालुका अध्यक्ष कैलास जाधव, जिल्हा समन्वयक योगेश हराळे, नगर तालुका अध्यक्ष नवनाथ घोरपडे, श्रीगोंदा प्रसिद्धी प्रमुख सचिन शेलार, सरचिटणीस नगर तालुका गोरक्षनाथ गव्हाणे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा सौ आशा मगर, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, , उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष रामराव काळे पुणे विभागीय कार्याध्यक्ष तथा शिक्षक भरतीचे जिल्हा सचिव महेश पाडेकर संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, सोमनाथ बोंतले, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी , श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे, जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे. सोनाली अकोलकर, विनाअनुदानित च्या राज्यअध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींनी दिली.
--------
Post a Comment