आगरकर मळा भागातील नागरीकांच्या वतीने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, यासाठी मनपा आयुक्त यांना निवदेन

आगरकर मळा भागातील नागरीकांच्या वतीने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, यासाठी मनपा आयुक्त यांना निवदेन प्रभाग क्र.15 मधील पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणार - दत्ता जाधव नगर - प्रभाग क्रमांक 15 मधील संपूर्ण आगरकर मळा, रेल्वेस्टेशन परिसर कटवण खंडोबा, कायनेटिक चौक, गायके मळा, पंचशील वाडी, इंगळे वस्ती हे परिसर व सर्व टाकी वरील मेन लाईन वरील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. आम्ही वारंवार प्रशासनाला कळवून सुद्धा काही सुधारणा झाली नाही. पाण्याचे टाकी वेळेवर भरत नाही. त्यामुळे नागरिकास पाणी मिळत नाही गेल्या 1 ते 2 महिन्यापासून सांगून देखील काही सुविधा होत नाही तरी याची दखल घेऊन पाण्याच्या आवक मधे वाढ करण्यात यावी. अन्यथा महानगरपालिके मधे उपोषणास बसू ह्याची दखल घ्यावी, असे निवदेनात नमूद करण्यात आले. मनपा एकीकडे पाणीपट्टीची भरमसाठ वाढ करते, तर दुसर्‍याकडे नागरीकांना पाण्या वाचून वंचित ठेवते. नागरीकांना आदीच दिवसाआड पाणी आणि त्यातही कमी दाबाने पुरवठा होतो. त्यामुळे नागरीकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते. तरी यामध्ये सुधारना होणे गरजचे आहे. अन्यथा नागरीकांसह मनपामध्ये तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन दत्ता जाधव यांनी व्यक्त केले. प्रभाग क्र.15 मधील आगरकर मळा भागातील नागरीकांच्या वतीने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, यासाठी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवदेन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक अनिल शिंदे, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, परिसरातील नागरीक मोठ्या संख्याने उपस्थित होते. यावेळी बोलतांना नगरसेवक अनिल शिंदे म्हणाले की, सर्वत्र उन्हामुळे पाण्याची कमतरता वाढू लागली. नागरीकांना पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे. या अगोदर सुध्दा मनपाच्या पाणी पुरवठा विभागास आम्ही सांगितले होते की, या भागातील नागरीकांना पाणी पुरवठा हा कामी प्रमाणात व अपुर्‍या दाबाने तर कामी भागातर पाणी पुरवठा होतच नाही. त्यामुळे नागरीकांच्या रोषाला आम्हा नगरसेवकांना उत्तरे द्यावे लागतात. अशावेळी प्रशासनाच कोणीही या भागाकडे लक्ष देत नाही. अशावेळी जर नागरीकांचा उद्रेक झाला तर त्याची सर्व जबाबदारी मनपा प्रशासनावर राहिल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post