योग विद्या धाम संस्थेच्या वतीने दि.16 पासून निसर्गोपचार वर्ग
योग विद्या धाम संस्थेच्या वतीने दि.16 पासून निसर्गोपचार वर्ग
अहिल्यानगर - येथील योग विद्या धाम या संस्थेमार्फत निसर्गोपचार वर्ग दि. 16 मार्च पासून सकाळ व संध्याकाळ या दोन स्वतंत्र बॅच मध्ये घेण्यात येणार आहे अशी माहिती योग विद्या धाम चे अध्यक्ष डॉ सुंदर गोरे यांनी दिली.
विना औषधी भारतीय पारंपारिक उपचार पद्धतीने निसर्गोपचारातील औषधोपचार पध्दती या वर्गामध्ये शिकवली जाणार आहे. तसेच सर्दी, खोकला, कफदोष, अस्थमा, सांधेदुखी, त्वचा विकार, नेत्रविकार, उच्च रक्तदाब, व इतर विकारावरील उपचाराची प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत. तरी हा निसर्गोपचार वर्ग जास्तीत जास्त लोकांनी करावा असे आवाहन योग विद्या धामचे कार्याध्यक्ष सुभाष पांढरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 0241 - 2421255 किंवा 9326940136 या नंबरवर संपंर्क साधावा.
---------
Post a Comment