दि.13 मार्च रोजी सामूहिक महाहनुमान चालीसा पठण व भजन संध्या कार्यक्रमास श्रीराम मंदिर नवी पेठ येथून होळी पासुन प्रारंभ

दि.13 मार्च रोजी सामूहिक महाहनुमान चालीसा पठण व भजन संध्या कार्यक्रमास श्रीराम मंदिर नवी पेठ येथून होळी पासुन प्रारंभ होळी पौर्णिमा ते हनुमान जन्मोत्सवापर्यंत अहिन्यानगर शहरात विविध ठिकाणी सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन नगर - श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळातर्फे वार्षिक अनुष्ठान 31 दिवसीय महाहनुमान चालीसा होळी पौर्णिमा ते हनुमान जन्मोत्सवापर्यंत चालणार्या सामूहिक हनुमान चालीसा पठण व भजन संध्या कार्यक्रम रोज रात्री 8 ते 10:30 या वेळेत नगर शहरांत विवीध ठिकाणी अत्यंत भक्ती भावाने सुरू होणार असुन सर्व अहिल्यानगर शहरवासीयांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळाच्यावतीने आवाहन करण्यात आले. यावेळी श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट श्रीराम मंदिर अध्यक्ष प्रितम मुथ्या व उपाध्यक्ष निखिल शेटीया यांनी सांगितले की, हा 31 दिवसीय कार्यक्रम गेल्या 18 वर्षापासून करण्यात येतो. नवीपेठ येथल श्रीराम मंदीरामध्ये मंडळाच्या वतीने दरवर्षी हनुमान जन्मोत्सव, श्रीराम जन्मोत्सव, गोकुळ अष्टमी, अन्नकूट महोत्सव, दिपोत्सव, श्रीराम लल्ला प्रतिष्ठा द्वादशी तसेच दर शनिवारी साप्ताहिक हनुमान चालीसा व महाप्रसाद वितरण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. 31 दिवस संपूर्ण शहरात दररोज विविध सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून सामूहिक महाहनुमान चालीसा पठण व भजन संध्या कार्यक्रम हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो. यामध्ये असंख्य भावीक भक्त एकत्रित येऊन हनुमान चालीसा पठण मोठ्या भक्ती भावाने करत असतात. तसेच भजन संध्येत भक्त तल्लीन होऊन या भक्ती गीतांमध्ये रमून जातात. अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात हा सामूहिक हनुमान चालीसा पठण आणि भजन संध्या कार्यक्रम होत असतो. गुरूवार दि.13 मार्च 2025 होळी पौर्णिमा या दिवशी श्रीराम मंदिर नविपेठ येथुन रात्रौ 8 वाजता शुभारंभ होईल व 12 एप्रिल 2025 हनुमान जन्मोत्सव या दिवशी समारोप होईल दरम्यान या 31 दिवसीय होणार्या कार्यक्रमांची भाविकांना याची माहिती मिळावी यासाठी शहरातील प्रत्येक प्रमुख मंदिरात माहिती फलक लावण्यात आले आहे श्रीराम भक्त हनुमान सत्संग ट्रस्ट श्रीराम मंदिर नविपेठ येथे होणार्या सर्व धार्मिक क्रार्यक्रमात व या 31 दिवस चालणार्या सामूहिक हनुमान चालीसा पठण आणि भजन संध्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट श्रीराम मंदिर अध्यक्ष प्रितम मुथ्था व उपाध्यक्ष निखिल शेटीया यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post