अंतर्बाह्य सुंदरता स्त्रीला आत्मविश्वास देते - धर्मदाय उपायुक्त पाटील
अंतर्बाह्य सुंदरता स्त्रीला आत्मविश्वास देते - धर्मदाय उपायुक्त पाटील
अहिल्यानगर वाचनालयात महिला वाचक सभासद सन्मान सोहळा
नगर - काही वर्षांपूर्वी ग्रामीण व शहरी भागातही महिला एकत्र येऊन वाळवण, जात्यावरची दळणे ,गाणी म्हणणे, अंगणातील सडा- रांगोळी, सणवार असा एकत्र येऊन संवाद करत असत. त्यातून त्यांचे एक सुदृढ नाते निर्माण होत.शहरी भागात पुढे आर्थिक सक्षमतेसाठी भिशी आली. त्यातून कुटुंबासाठीआर्थिक निधी उभारला जाऊ लागला हे खूप आशादायी बाब होती. सद्यस्थितीत मात्र त्याचे किटी पार्टीत रूपांतर झाले व दिसण्याची राहण्याची एक वेगळी स्पर्धा सुरू झाली. त्यामधून स्त्रीच्या सक्षमतेला ,सुसंवादाला लगाम बसला. सुसंवाद सोडून किटी पार्टी आणि स्टेटस ला महत्त्व आले. खरंतर आपण आहोत तसेच सुंदर मानून मनातील न्यूनगंड काढणे हे खरी गरज आहे. आपण दिसतो कसे यापेक्षा आपली अंतर्बाह्य सुंदरता आपल्याला एक वेगळाच आत्मविश्वास देते. त्याची आज खरी समाजात गरज असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगरच्या धर्मदाय उपायुक्त श्रीमती यू एस पाटील( चव्हाण) यांनी व्यक्त केले.
महिला दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगर जिल्हा वाचलयात महिला वाचक सभासद, कर्मचारी व संचालिका यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी त्या संवाद साधत होत्या. वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक, प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड, उपाध्यक्ष दिलीप पांढरे ,संचालक किरण अग्रवाल ,संचालिका प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ ,ग्रंथपाल अमोल इथापे, सहा.ग्रंथपाल नितीन भारताल उपस्थित होते.
उपायुक्त श्रीमती पाटील यांनी आपल्या मनोगतात अनेक विषयांना स्पर्श करताना बुद्धीचा विकास हे मानवाचे निरंतर चालणारे ध्येय आहे .माणसाचे वय वाढले किंवा त्याने पुस्तके वाचले तरी त्याला माणसे वाचता आली तर परिपक्वता आली असे म्हणता येईल. स्री सातत्याने कुटुंब ,नातेवाईक, मुले ,करिअर, नोकरीयासारख्या अनेक पातळीवर सजगपणे परिपक्व होत असते. मात्र त्यामध्ये तिने स्वतःकडे पाहण्याचा सजगदृष्टीकोन विसरता कामा नये. कुटुंबासाठी पौष्टिक आहार, व्यायाम, हेल्थ पॉलिसी, घरातील सुसंवाद व समाधान मानण्याची वृत्ती या गोष्टीचा आग्रह व कृती महिलांनी केली तर कुटुंब व समाज सुदृढ होईल असा आशावाद व्यक्त केला.
प्रास्ताविकात वाचनाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक यांनी ऐतिहासिक जिल्हा वाचनालयाने द्वि शतकाकडे वाटचाल करताना अनेक चढ-उतार ,घटना परिवर्तने पाहिली व ते संदर्भ जतन करून ठेवले आहेत. देशात सर्वच पातळीवर स्त्रीने स्वतःचे कर्तृत्व व अस्तित्व सिद्ध केले असताना आजचा होणारा कार्यक्रम स्रीशक्ती व त्यांची प्रतिभा यांची उंची वाढवणारा ठरेल असा आशावाद व्यक्त केला .
याप्रसंगी धर्मदाय उपायुक्त श्रीमती एस पाटील यांचा सन्मान अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक व प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी केला.
श्रीमती पाटील यांच्या हस्ते कर्तृत्वान महिला सदस्य पद्मजात धोपाकर ,शिल्पा रसाळ ,संजीवनी बर्डे ,प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी ,पल्लवी कुक्कडवाल ,वर्षा जोशी सारिका देव पौर्णिमा गायकवाड साक्षी पद्मा ,दिपाली कल्याणम ,मंगल कदम, कांचन हेंद्रे ,शारदा परदेशी, लीना घोगरे, विद्या मुनोत,प्रीतम कटारिया, वैशाली पटवा ,अनुष्का व तनिष्का ठाकूर, अश्विनी घुगरे ,सौ शहा यांचा पुस्तके शाल ,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक व परिचय प्राध्यापक ज्योती कुलकर्णी स्वागत कार्यवाह विक्रम राठोड तर आभार शिल्पा रसाळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय गाडेकर संकेत पाठक ,निखिल ढाकणे, बाबा सिकंदर यांचे सहकार्य लाभले.


Post a Comment