महिलांनी महिलांचा सन्मान करायला हवा- बापूसाहेब डोके

महिलांनी महिलांचा सन्मान करायला हवा- बापूसाहेब डोके डोके विद्या मंदिरात महिला शिक्षिकांचा डोके समाज विकास प्रतिष्ठानतर्फे सन्मान नगर - आज स्पर्धात्मक युगात प्रत्येकजण यश मिळविल्यासाठी धडपड करतो, अशा परिस्थितीत आप-आपल्या जवळच्या माणसाशी स्पर्धा होते. महिला देखील एकमेकींशी स्पर्धा करुन यश मिळवितात. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून राष्ट्रापती पद ते सरपंच पदापर्यंत त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, मदर तेरेसा अशा कतृत्ववान महिलाचा आर्दश घेवुन महिलांनी कार्य करावे. महिलांनी महिलांचा सन्मान करुन मोठेपणा दाखवावा. असे प्रतिपादन सौ.लक्ष्मीबाई शांताराम डोके समाज विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब डोके यांनी केले. निर्मलनगर येथील सौ.लक्ष्मीबाई शांताराम डोके विद्या मंदिर व साई विद्यालयातील सर्व शिक्षिकांचा जागतिक महिला दिनानिमित्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब डोके यांच्या हस्ते सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका रिबेका क्षेत्रे, मंजू नवगिरे, आशा धामणे, सुजाता कर्डिले, ज्योती पवार, मंदाकिनी पांडूळे, राणी राऊत, मुख्याध्यापक संभाजी पवार, गहिनीनाथ गर्जे, ठोंबरे सर, सतिष राजगुरु, छबुराव फुंदे, बी.जे.जाधव, संजय राऊत, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना श्री.बापूसाहेब डोके की, पुर्वीची चुल आणि मुल ही संकल्पना कालाबाह्य होऊन आज महिलांची भुमिका बदलली आहे. शिक्षणामुळे मुली शिकून स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करीत आहे. आपल्या कर्तुत्वाने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाने स्वत:चा वेगळा ठसा उमठवित आहे. त्यामुळे रोजच महिला दिन साजरा करावा, पुरुषांनी देखील महिलांचा सन्मान करुन आदर व्यक्त करावा,असे सांगितले. प्रास्तविकात छबुराव फुंदे यांनी सौ.लक्ष्मीबाई यांच्या आदर्श जीवनाची माहिती दिली. त्यांनी कुटुंबातील सर्वांना शिक्षणाचे धडे दिल्याने डोके परिवार सुसंस्कृत घडला. त्यांचा आदर्श घेऊन डोके परिवाराच्या प्राथमिक, माध्यमिक शाळेतून असंख्य विद्यार्थी घडत आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. महिला दिनानिमित्त आमचा सन्मान करुन आम्हाला प्रेरणा देण्याचे काम डोके प्रतिष्ठान केले असून संस्था ही कायम आमच्या पाठीशी असल्याबद्दल धन्यवाद दिले. सूत्रसंचालन मंदाकिनी पांडूळे यांनी केले तर आभार संभाजी पवार यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post