अहमदनगर (प्रतिनिधी) :- इतिहासाच्या पानावर ज्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले अशा कार्यकर्तृत्वान, कर्मयोगिनी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त विचार भारतीच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्पर्धा प्रमुख प्रा. अशोक सागडे यांनी दिली.
या स्पर्धेसाठी १) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - एक कुशल प्रशासक. २) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे धार्मिक कार्य. ३) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कृषी धोरण. ४) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रतीक असे विषय ठेवण्यात आले आहेत. सदर स्पर्धा दोन टप्प्यात होणार असून शुक्रवार दि. २४ मे न्यू आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज च्या सेमिनार हॉल मध्ये प्राथमिक फेरी होईल. या फेरीमध्ये प्रथम येणाऱ्या ५० स्पर्धकांच्या प्रवेशिका स्वीकारल्या जातील. व त्यामधून परीक्षकांच्या मूल्य मापणानुसार पहिल्या ११ क्रमांकपर्यंत स्पर्धक निवडले जातील. त्यांची अंतिम फेरी शुक्रवार दि. ३१ मे रोजी यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह, स्टेशन रोड, अहमदनगर येथे होईल. व त्यामधून प्रथम, द्वितीय, तृतीय, व उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांक परीक्षकांच्या मूल्य मापणानुसार निवडले जातील तरी इच्छुक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा.
स्पर्धेची नियमावली, बक्षिसे, प्रवेशिका फॉर्म, व इतर माहितीसाठी श्री बलभीम पठारे भ्रमणध्वनी क्रमांक ९४२०४७०००१, श्री प्रशांत जठार भ्रमणध्वनी क्रमांक ९७३०००३९२० या क्रमांकावर फोन करून माहिती घ्यावी असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका दि. २१ मे पर्यंत वरील भ्रमणध्वनी क्रमांकावर पाठवाव्यात असे आवाहन विचार भारतीचे सुधीर लांडगे व अनिल मोहिते यांनी केले आहे.
Post a Comment