जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यार्थ्यांसमवेत साजरी केली जयंती
अहमदनगर: टिळक रोड वरील जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयातील निवासी विद्यार्थी यांच्या करिता भोजनाची व्यवस्था करत त्याच्या समवेत डाक कर्मचारी यांनी जयंती साजरी केली.
जयंती उत्सवाचा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून,
जयंतीच्या पूर्वसंध्येला अहमदनगर प्रधान डाकघरामध्ये डॉ अतुल मडावी यांच्याद्वारे डाक कर्मचारी यांचेसह कुटुंबियाकरिता दंततपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते,यामध्ये साथपेक्षा अधिक कर्मचारी यांनी सहभाग घेत दंत तपासणी करून घेतली.
जयंतीदिनी मुख्य डाकघराच्या पासपोर्ट हॉलमध्ये प्रतिमापूजन, बौद्धाचार्य राहुल कांबळे,लक्ष्मण माघाडे,गौतम पाचारणे,आदिनाथ ठोबे यांचे प्रमूख उपस्थितीत त्रिशरण पंचशील वंदना म्हणत अभिवादन करण्यात आले.
यावेळी पोस्टल संघटनेचे नेते संतोष यादव, सहायक अधिक्षक संदिप हदगल,सतिष येवले,महेश तामटे,कमलेश मिरगणे संदिप कोकाटे,सागर कलगुंडे,प्रफुल्ल काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याच प्रसंगी कु स्वामीनी महेश तामटे या छोट्या बालिकेने आपले मनोगत सादर करत उपस्थिताची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपक कुंभारे ,सूत्रसंचालन अमोल साबळे तर आभारप्रदर्शन दिपक नागपुरे यांनी केले.
त्यानंतर टिळकरोड वरील जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयातील निवासी विद्यार्थी यांचे करिता दुपारच्या भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आलेली होती.
यावेळी पोस्टल संघटनेचे नेते संतोष यादव,संदिप हदगल ,बाबासाहेब शितोळे, संतोष घुले, नितीन थोरवे,अरुण रोकडे,अमोल साबळे, दिपक नागपुरे प्रदिप सूर्यवंशी,यांचे सह विद्यालयाचे प्राचार्य विजय आरोटे,शिवानंद भांगरे,सहदेव करपे यांचेसह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment