*मा. आमदार सदाभाऊ खोत, मा. श्री. सत्यजित देशमुख, मा. श्री. सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती*
सामना समिती चे प्रमुख किशोर कदम यांची माहीती
घबकवाडी, ता. वाळवा येथील सरपंच प्रेमी ग्रुप च्या वतीने सालाबाद प्रमाणे सरपंच चषक हाप पिच टेनिस बॉल नाईट क्रिकेट टूर्नामेंट पर्व दूसरे चे आयोजन करण्यात आले असुन शुक्रवार १७ / ५/ २०२४ रोजी रात्रौ ठिक ८:०० वाजता बक्षिस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सामना समिती प्रमुख किशोर कदम यांनी दिली.
स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभास महाराष्ट्राचे माजी कृषी व पाणी पुरवठा मंत्री मा. आमदार श्री. सदाभाऊ खोत, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. श्री. सत्यजित देशमुख (भाऊ), शिराळा विधानसभा मतदार संघ प्रमुख मा. श्री. सम्राट महाडिक ( बाबा ), रयत क्रांती संघटनेचे वाळवा तालुकाध्यक्ष श्री. अमोलदादा पाटील, श्री. डी. के. पाटील, गांवच्या लोकनियुक्त सरपंच संगिता माणीकराव कदम, माजी आदर्श सरपंच संजय कदम, श्री. बजरंग कदम (आण्णा) आदी मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार असुन सामना समितीच्या वतीने प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठीचे अतीम सामने होणार असुन लगेच मान्यवरांच्या शुभहस्ते विजयी संघाना बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.
सहा दिवस नाईट मध्ये सुरू असलेल्या नाईट क्रिक्रेट टुर्नामेंट मध्ये एकूण ४८ क्रिकेट संघानी आपला सहभाग नोंदविला आहे. अंतीम फायनलसाठी १) के. के. स्पोर्टस इस्लामपूर २) फौजी स्पोर्टस धुमाळवाडी, ३) सरपंच प्रेमी स्पोर्टस घबकवाडी, ४) डी. जे. बॉईज इस्लामपूर हे संघ उतरत आहेत. स्पर्धा यशस्वीतेसाठी किशोर कदम, विनोद कदम ( फौजी), अभिजीत कदम, अजित कदम, सौरभ कदम, अनुराग कदम, प्रतिक कदम, विशाल कदम, संतोष कदम, प्रसाद कदम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. सयाजीराव खोत, अमित कदम, पवन कदम, दिपकराव खोत, विनायक कदम, सुनिल भारती, राहूल मुळीक, हंबीरराव कदम, कृष्णात खोत, बाबासो भारती, दत्तात्रय डंगारणे, किरण कदम, सुजल कदम यांच्यासह सर्व युवक व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
Post a Comment