देविदास गोरे यांची पोस्टल इन्स्पेक्टर म्हणून निवड

 



अहमदनगर: अहमदनगर प्रधान डाकघर येथे डाक सहाय्यक म्हणून कार्यरत असणारे देविदास संपत गोरे हे खाते अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण होत इनस्पेक्टर ऑफ पोस्ट यापदी त्यांची निवड झाली व प्रथम पोस्टिंग नॉर्थ डिव्हिजन मुंबई येथे  करण्यात आली.
    मिरजगाव ता कर्जत येथील रहिवासी असणारे देविदास संपत गोरे यांनी आपल्या डाकसेवेची सुरवात 2011 मध्ये रत्नागिरी येथून केला त्यानंतर अहमदनगर व  पुणे विभागात त्यानी काम पाहिले, अनुभवी ,कामाची उत्तम माहिती,मितभाषी अशी त्याची ओळख आहे.त्यानी 2022 मध्ये त्यानी खाते अंतर्गत इन्स्पेक्टर ऑफ  पोस्ट या प्रशासकीय अधिकारी पदासाठी परीक्षा देत यश मिळवले.
   त्यानिमित्ताने  त्याचा अहमदनगर प्रधान डाकघर येथे त्याचा निरोप समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय बोदर्डे पोस्टमास्तर हे होते.
पोस्टल संघटनेचे राज्याचे  कार्याध्यक्ष संतोष यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गोरे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत,आपणास मिळालेले यश हे निश्चितच कौतुकास्पद असून आपली प्रशासकीय अधिकारी म्हणून झालेल्या निवडीचा आम्हास सार्थ अभिमान आहे.आपल्या  प्रशासकीय सेवेस मुंबई येथून प्रारंभ होत असून,आपण मुंबई मध्ये काम करत असताना मुंबई मध्ये आपला कामाचा आदर्शवत ठसा उमठावावा अपेक्षा व्यक्त केली
   यावेळी दिपक कुंभारे, नितीन थोरवे,दिपक शिंदे,अरुण रोकडे,सतिष येवले, कमलेश मिरगणे, सागर पंचारिया, आश्विनी चिंतामणी, रुपाली निसळ,आश्विनी फुलकर,सुभाष बर्डे,यांच्या सह मोठ्या संख्येने डाक कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक कमलेश मिरगणे यांनी तर सूत्रसंचालन सतिष येवले यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post