धर्मदाय रुग्णालय जिल्हास्तरीय समितीवरआ.प्रा.राम शिंदे यांची नियुक्ती

 

                                                                              नगर -   शासनाच्या विधि व न्याय विभागाच्या निर्णयान्वये धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करुन देण्याकरीता गठीत जिल्हास्तरीय समितीवर माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे  यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा शासन आदेश विधी विभागाचे अवर सचिव सचिन कस्तुरे यांच्या सहीने दि.14 मार्च 2024 काढण्यात आला आहे.

     न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळण्याकरीता योजना तयार केलेली आहे. त्यानुसार प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील एकूण खाटांपैकी 10 टक्के खाटा निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व 10 टक्के खाटा दुर्बल घटकांतील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे या रुग्णांलयांना बंधधनकारक आहे.

     धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित खाटा पारदर्शी पद्धतीने निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना उपलब्ध करुन देण्यासाठी विधि व न्याय विभागाच्या निर्णयान्वये राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्यस्तरीय विशेष मदत कक्षास सहाय्य करण्यासाठी विधी व न्याय विभागाच्या निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेली जिल्हास्तरीय समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. सदर समितीवर जिल्ह्यातील विधानसभा, विधान परिषद सदस्य, जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील एक समाजसेवक, जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ यांची नियुक्ती विधि व न्याय मंत्री यांच्या मान्यतेने करण्याची तरतुद करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post