जागतिक महिला दिनी 62 महिलाचा महिला सन्मान बचतपत्रदेऊन गौरव. पोस्टाची महिला सन्मान बचतपत्र


महिलांची सन्मान करणारी योजना...श्री बी नंदा
●केडगाव पोस्टाचा उपक्रम

*केडगाव*: भारत सरकारच्या वतीने आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने खास महिला व  मुलीकरिता *महिला सन्मान बचत पत्र* ही योजना  दि 1 एप्रिल 2023  पासून देशभरातील सर्वच पोस्ट ऑफिसमधून  सुरू करण्यात आलेली होती.
प्रथम पासूनच केडगाव पोस्ट ऑफिसद्वारे योजनेची  नियोजनबद्ध प्रचार प्रसिद्धी करत,अधिकाधिक महिलापर्यंत योजनाची माहिती देत आज अखेर 600  महिलांची खाती उघडत,अहमदनगर पोस्टल  विभागात केडगाव पोस्ट ऑफिस  अग्रेसर असून त्याद्वारे  विक्रमी गुंतवणूक करण्यात यशस्वी ठरले.
केडगाव पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर श्री संतोष यादव व त्याच्या संपूर्ण टीमने यासाठी पोस्टऑफिसमध्ये स्वतंत्र व्यवस्था करत, सातत्याने विविध ठिकाणी भेटी देत या योजनेची माहिती दिली,स्थानिक व्हाट्सउप ग्रुपच्या माध्यमातून योजना सर्वदुर पोहचविण्याचा प्रयत्न केला.
आज दि 8 मार्च जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत एकाच दिवशी  62 महिलाद्वारे नवीन खाते उघडले गेले.
यासर्व महिलांचा यथोचित गौरव करत, प्रातिनिधीक स्वरूपात काही महिलांना बचतपत्राचे वाटप  डाक विभागाचे प्रवर अधिक्षक श्री बी नंदा यांच्या शुभहस्ते तर सहाय्यक अधिक्षक श्री संदिप हदगल,श्री बाळासाहेब बनकर  यांचे उपस्थितीत करण्यात आले.
योजनेच्या गुंतवणूकदार श्रीमती पूजा शेवाळकर,प्रज्ञा शर्मा,शुभांगी यादव,पंकजा धर्म, सारिका क्षीरसागर,योगिता रोकडे, रेखा पवार,अस्मिता कुलकर्णी, श्रावणी खानविलकर,द्वारका कोतकर,भावना शर्मा, मंदा साळवे,स्वाती पाचारणे,संगीता कांबळे, अनिता पवार,सुजाता कोतकर,यांना मान्यवरांच्या हस्ते बचतपत्राचे  वितरण केले गेले.
दि 1 एप्रिल 23 ते 8 मार्च 24  कालावधीत 600 महिलांनी सहभागी होत सहा कोटी अठरा लाख रु पेक्षा अधिक गुंतवणूक या योजनेत केली.
डाक विभागाचे प्रवरअधिक्षक श्री बी नंदा,सहायक अधिक्षक श्री संदिप हदगल,श्री बाळासाहेब बनकर सिनियर पोस्टमास्तर श्री संजय बोदर्डे यांच्या विशेष प्रोत्साहनाने व श्री संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली  केडगाव पोस्ट ऑफिसच्या श्रीमती शुभांगी मांडगे,श्रीमती प्रियांका भोपळे  या महिला कर्मचारी यांनी आपले विशेष योगदान या कामी दिले.श्री गहिनीनाथ पालवे,श्री डी बी कुलकर्णी,श्रीमती पंकजा धर्म,श्रीमती लता कोरे, श्रीमती संगीता शर्मा,श्रीमती वंदना संचेती, रेखा पावसे  या महिला प्रधान अभिकर्ते यांच्या विशेष सहयोगाने व श्री महेश क्षीरसागर,अंबादास सुद्रीक,श्री शिवाजी कांबळे,श्री संजीव पवार,श्री सूर्यकांत श्रीमंदिलकर श्री अनिल धनावत,श्री सुनील जाधव,सुनील रोकडे,प्रियांका वाळुंजकर या पोस्टमन बांधवानी आपले नियमित टपाल वाटपाच्या कामासोबत या योजनेच्या प्रसिद्धीकरीता आपले अनमोल योगदान दिले.
या योजनेत आगामी कालावधीत सुद्धा अधिकाधिक महिला व मुलीनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री संतोष यादव यांनी केले.
     
  ------        चौकट------
*योजनेची वैशिष्ट्ये* 
●योजना महिला व मुलीकरिता
●बचत पत्राची मुदत 2 वर्ष
●योजनेस व्याज दर 7.5% प्रतिवर्षी राहील.व्याज चक्रवाढ पद्धतीने असेल.
●एका महिलेच्या नावावर  किंवा मुलीच्या  नावावर तिचे पालक या योजनेचे बचत पत्र घेऊ शकतात.
●किमान गुंतवणूक 1000/- व कमाल गुंतवणूक रु दोन लाख  पर्यंत कितीही बचत पत्र घेता येईल.
● दोन खात्यामध्ये किमान तीन महिन्याचे अंतर असले पाहिजे.
● एक वर्ष झाल्यानंतर खात्यातील 40% ,रक्कम एकदाच काढता येईल.
●अपवादात्मक परिस्थितीशिवाय खाते मुदतपूर्व बंद करता येणार नाही.
--------------------------- ---
      कोट:

*महिला सन्मान बचतपत्र* ही योजना महिला व मुलीचा सन्मान करणारी व सर्वाधिक व्याजदर देणारी योजना आहे.त्यामुळेच योजनेस  महिलांचा भरघोस  प्रतिसाद  मिळत आहे.
तरी  यापुढे जास्तीत जास्त महिलांनी व मुलींनी या योजनेत सहभागी होत आपली गुंतवणूक करावी. ही विनंती



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post