जगद्गुरु संत तुकाराम महाराज बिजोत्सवानिमित्त पारायण सोहळ्याचे आयोजन

 
नगर - सालाबादप्रमाणे  जगद्गुरु संत तुकाराम महाराज बिजोत्सवाचे विठ्ठल मंदिर, शेंगागल्ली, गंजबाजार, नगर येथे दि. 21 ते 28 मार्च दरम्यान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 21 रोजी सौ.जयश्री व श्री.सुनिल सिद्ध यांच्या हस्ते महापुजा होईल.  गाथा पारायणाचे व्यासपीठ चालक म्हणून हभप विनायक महाराज काळे असणार आहेत. तसेच दररोज सकाळी 8 ते दु. 1 गाथा पारायण, दु.3.30 ते 5 नगर शहरातील विविध भजनी मंडळाचे भजने, सायं. 5 ते 6 हरिपाठ, व सायं. 6 ते 8 किर्तने होणार आहेत. 
गुरुवार दि. 21 रोजी हभप वैशालीताई शेंडे (पारनेर), दि.22 रोजी हभप लक्ष्मण महाराज बेलेकर (आळकुटी), दि.23 रोजी हभप वैष्णवीताई तावरे (आष्टी), दि.24 रोजी हभप दिपालीताई कुरे (छत्रपती संभाजीनगर), दि. 25 रोजी हभप मोनिकाताई शेंडगे (काष्टी), दि. 26 रोजी हभप गणेश महाराज सानप (केडगांव) हे आपली किर्तन सेवा सादर करतील.
बुधवार दि. 27 रोजी सकाळी 10 वा. हभप अतुल महाराज भुजाडी (राहुरी) यांचे किर्तन होईल. दु. 12 वा. शोभायात्र व दु. 1.30 वा. महाप्रसाद होईल. गुरुवार दि.28 रोजी 10 वा. हभप गणेश महाराज शेंडे (पिंपळनेर) यांचे काल्याचे किर्तन होईल. त्यानंतर काल्याचा महाप्रसाद होईल. 
तसेच रविवार दि. 24 रोजी सकाळी 9 वा. आनंदऋषीजी रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दु. 2 वा. रांगोळी स्पर्धाही होणार आहे. यासाठी सौ.सपना तांबोळी (मो.9075001403) व सौ.मनिषा उबाळे (मो.8623988862) यांच्याशी संपर्क साधावा.
तरी वरील सर्व कार्यक्रमास भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सत्संगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलवंत वाणी समाज विठ्ठल-मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो.9270064048 या नंबरवर संपर्क साधावा.
-----------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post