मुलांवर संस्कार रुजविल्यास त्याच्यातील आत्मविश्वास वाढतो - आरटीओ चेतन दासनूर
नगर - मुलांना आज आधुनिक शिक्षणाबरोबरच संस्काराक्षम बनविणे गरजेचे आहे. लहानपणापासूनच मुलांवर संस्कार रुजविल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला जातो. स्नेसंमेलनातून मुलांमधील कला-गुणांना व्यासपीठ मिळते. त्यासाठी पालकांनीही आपल्या पाल्यांतील गुण ओळखून त्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. जिनिअस ग्लोबल स्कूलच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देत त्यांचे भविष्य घडवत आहेत, असे प्रतिपादन आरटीओ अधिकारी चेतन दासनूर यांनी केले.
तपोवन रोड, कजबे मळा, भिस्तबाग येथील जिनिअस एज्युकेशनल अॅण्ड सोशल फौंडेशन संचलित जिनिअस ग्लोबल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आरटीओ अधिकारी चेतन दासनूर हे होते. याप्रसंगी फौंडेशनचे अध्यक्ष प्रा.बाळासाहेब शेंडगे, सेक्रेटरी पुजाताई कजबे, सहसचिव इंजि.डि.आर.शेंडगे, उपाध्यक्ष शंकर सानप, बाळासाहेब कजबे, राहुल कजबे, पांडूरंग गवळी, शंकर सानप, पत्रकार कुणाल जायकर, सौ.शोभा दातीर आदि उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.बाळासाहेब शेंडगे म्हणाले, जेनिअस एज्युकेशनल अॅण्ड सोशल फौंडेशनच्या माध्यमातून नर्सरी ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरु आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्थेच्यावतीने विविध उपक्रम राबविले जातात. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थीही विविध स्पर्धा, परिक्षांमध्ये चांगले यश मिळवून संस्थेचे नाव उज्वल करत आहेत. स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांसाठी एक चांगले व्यासपीठ मिळत असल्याने त्यांच्यातील कला-गुण सर्वांसमोर येतात. विद्यार्थ्यांनी सादर केलेले कलेतून दिशा मिळणार असल्याचे सांगितले
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, गायन, वादन यातून सामाजिक संदेश देत उपस्थितांची मने जिंकली.
प्रास्तविक संस्थेचे संचालक महेंद्र म्हसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ.उषा मसुरे, सौ.ज्योती म्हसे, स्वाती डोमकावळे, तनुजा साळवे यांनी परिश्रम घेतले. तर स्वाती डोमकावळे यांनी आभार मानले.
Post a Comment