ओंकार कॉम्प्युटर्सच्या वतीने हळदीकुंकू समारंभ साजरा

 


नगर-  भिंगार येथील ओंकार कॉम्प्युटर्स मध्ये साजरा होत असणारा हळदीकुंकवाचा सण यावर्षी देखील साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भिंगार परिसरातील 200 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. प्रत्येक वर्षी ओंकार कॉम्प्युटर्स तर्फे नवनवीन उपक्रम घेतले जातात. महिलांसाठी खेळीमेळीच्या वातावरणात हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यानिमित्ताने विविध खेळ घेण्यात आले रोजच्या कामातून थोडा वेळ काढून महिलांना विरंगुळा मिळावा या उद्दिष्टाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
         कार्यक्रमाच्या वेळी महिलांना डिजिटल साक्षरतेचे महत्व समजून सांगण्यात आले, यासाठी एमकेसीएल चे प्रतिनिधी म्हणून भाऊसाहेब आठरे हे उपस्थित होते व त्यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले.
      ओंकार कॉम्प्युटर्स च्या संचालिका सौ.शितल भुतकर यांनी महिलांना शिक्षणाचे महत्त्व समजून सांगत डिजिटल साक्षरतेमुळे काय फायदे होऊ शकतात हे समजून सांगितले.
       डिजिटल साक्षरते बरोबर महिलांनी विविध खेळ खेळून कार्यक्रमाचा भरपूर आनंद लुटला.
यावेळी विविध क्षेत्रातील महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या. उपस्थित सर्व महिलांना वाण देण्यात आल्या.
      हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंजली कोल्हाल, जिया घडसिंग, सायली मकासरे यांच्याबरोबर ओंकार कॉम्प्युटर्सच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post