नगर- दातरंगे मळा येथील एकदंत कॉलनीत गणेश जयंती उत्सवानिमित्त धार्मिक,सांस्कृतिक, सामुदायीक विवाह, आरोग्य शिबिराबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे हे 20 वे वर्षे असून दर वर्षी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. तसेच विविध कार्यक्रमांनी व सामाजिक उपक्रमांनी या उत्सवाची शोभा वाढते. या गणेश जयंती निमित्त मंडळाच्यावतीने सामुदायिक विवाह सोहळा करण्यात येतो. यामध्ये दरवर्षी 3-4 जोडप्यांचा विवाह लावण्यात येतात. तसेच जयंती उत्सवाचे औचित्याने रक्तदान शिबीर, नेत्र, दंत, आरोग्य तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, 100 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, प्रेरणादायी शिव व्याख्यान असे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. या जयंती उत्सवास हजारो लोक दर्शनासाठी गर्दी करुन महाप्रसादाचा लाभ घेतात. श्री एकदंत गणेश मंदिर, मंडळाचे सर्व सदस्य व एकदंत परिवार व एकदंत महिला मंडळ यासाठी विशेष परिश्रम घेतात.
श्री एकदंत गणेश जन्मोत्सव 13 फेब्रुवारी 2024 रोजी असून त्यानिमित्त गुरुवार दि. 8 फेब्रुवारी 2024 रोजी दिप प्रज्वलनाने गणेश जयंती उत्सवास स.9 वा. प्रारंभ होईल.,संध्या.7 ते रा.10 वा. हनुमान चालिसा (श्री रामभक्त हनुमान सत्संग मंडळ), शुक्रवार दि.9 रोजी सकाळी 10 ते दु.4 मोफत आरोग्य, नेत्र तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, दंत तपासणी, औषध वाटप शिबीर, संध्या.7 वा.आर.जे.सोहम यांचे प्रेरदायणी शिव व्याख्यान, शनिवार दि.10 रोजी संध्या.7 ते रा.10 वा. रंगारंग कार्यक्रम (डान्स मनोरंजन), रविवार दि.11 रोजी स.10 ते दु.5 पर्यंत रक्तदान शिबीर, रात्री 8 ते 10 अंताक्षरी स्पर्धा (खुला गट), सोमवार दि.12 रोजी दु.12 वा. 100 गरजु विद्यार्थ्यांना दप्तर वाटप, संध्या.7 ते रा.10 वा.हळदी कुंकु समारंभ (एकदंत महिला मंडळ) व सांस्कृतिक कार्यक्रम बत्काम्मा असे सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम होईल.
श्री गणेश जयंती दिनी मंगळवार दि.13 फेब्रुवारी 2024 रोजी स.7 ते 9 श्री विघ्नेश्वर पूजन व श्री गणपती अथर्वशिर्ष, नाममुर्ती अभिषेक, स.9 ते 10.30, होम हवने, स.9 ते दु.12 ‘श्री’ च्या मुर्ती मिरवणुक व पुर्णाहुती, स.10 ते दु.1 श्री सत्यनाराण महापूजा, दु.1.21 वा. सामुदायिक विवाह सोहळा, दु.1.30 ते 3 महाप्रसाद (भंडारा), दु.4 ते सायं.7 यावेळेत लहान बालकांसाठी गंमत जंमत व बाल मेळावा, असे कार्यक्रम होतील तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री एकदंत गणेश मंडाळ व श्री एकदंत महिला बचत गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे.
-------
Post a Comment