पद्मशाली सोशल फाउंडेशनच्या वतीने उत्कर्ष बालगृहास मिष्टान्न भोजन व खाऊ वाटप
पद्मशाली सोशल फाउंडेशनचे कार्य अनुकरणीय - सौ. पूजा गुंडू
नगर - पद्मशाली सोशल फाउंडेशन नेहमीच सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असून अनेक गरजवंतांना मदत करण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने करत असतात. फाउंडेशनच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून समाजामध्ये सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असते. फाउंडेशनचे हे सर्व कार्य अनुकरणीय असल्याचे सौ. पूजा गुंडू यांनी केले.
पद्मशाली सोशल फाउंडेशन चे सदस्य संतोष गुंडू यांचा मुलगा गौतम याच्या वाढदिवसानिमित्त पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने उत्कर्ष बालगृहास मिष्ठान्न भोजन व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सौ.लक्ष्मी गुंडू, नरेंद्र गुंडू, सौ.सुनंदा गुंडू, सौ.रुतिका गुंडू, श्री. रोहित गुंडू, अभिजित भुस्सा, अमित येमुल, सौ.दिव्या येमूल, मुबिन् शेख, शुभम येमूल, सौ.मेघना येमूल, प्रमोद गुंजाळ, सौ.रेमा गूंजाळ , राहुल दुलम आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात अभिजित भुस्सा म्हणाले की, फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवून गरजवंतांना मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. संतोष गुंडू यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पद्मशाली सोशल फाउंडेशनकडे वाढदिवसाचा खर्च टाळून देणगी दिली. या देणगीच्या माध्यमातून फाउंडेशनने उत्कर्ष बालगृहास मिष्टान्न भोजन व खाऊ देण्यात आले, असे त्यानी सांगितले.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने पद्मशाली सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उत्कर्ष बालगृहाचे संचालक युवराज गुंड यांनी सर्व फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.
--------------
Post a Comment