नगर - आमदार प्रा. राम शिंदे यांनी नागपुर येथे हिवाळी अधिवेशनात बोलताना अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ करण्याचा निर्णय झाला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 मे 2023 रोजी चोंडी (अहमदनगर) येथे जाहीर केले होते. तसा अहिल्याप्रेमीमध्ये आनंद व्यक्त झाला होता. मात्र अद्याप या बाबतीत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, म्हणून सर्वत्र नाराजी पसरली आहे. या बाबतीत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली.
यावर उपसभापती डॉ. निलम गोर्हे यांनी शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी सूचना केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदण्यात यावे. याबाबत विविध हिदूत्ववादी संघटनांनी पुढाकार घेतला होता, त्याच बरोबरच आ.राम शिंदे यांनीही या मागणीस पाठिंबा देत, अहमदनगरचे नाव ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ करण्यात यावे, अशी सरकारकडे केली होती. आ.गोपीचंद पडळकर, आ.नितेश राणे यांनीही नामांतराची मागणी उचलून धरली होती.
गेल्या 31 मे 2023 रोजी जिल्ह्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते. त्यांनी त्यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ असे नामकरण केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर प्रशासकीय पातळीवरही थोड्याफार हालचाली झाल्या, परंतु त्यानंतर कोणतीही कार्यवाही पुढे झाली नाही. याबाबत आ.प्रा.राम शिंदे यांनी काल हिवाळी अधिवेशनात ‘अहमदनगरच्या नामांतराचा प्रश्न उपस्थित करुन ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ कार्यवाहीबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर शासनाच्यावतीने समाधानकारक उत्तर न मिळल्याने उपसभापती यांनी याबाबत गांभिर्याने दखल घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.
आ.प्रा.राम शिंदे यांनी विधानसभेत ‘अहिल्यादेवी होळकरनगर’चा प्रश्न उपस्थित करुन पुढील कार्यवाहीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल विविध हिंदूत्ववादी संघटनांनी, नामांतरासाठी लढा देणार्यांनी त्यांचे अभिनंदन करुन आनंद व्यक्त केला.
---------
Post a Comment