अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी मधील दोनशे विद्यार्थीचा सहभाग
केडगाव: भारतीय डाक विभागाच्या वतीने दि 9 ऑक्टोबर हा जागतिक टपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो , या दिनाचे औचित्य साधत दि 9 ते 13 ऑक्टोबर या दरम्यान राष्ट्रीय डाक सप्ताह हा विविध कार्यक्रम करत साजरा केला जातो.
केडगाव पोस्ट ऑफिसद्वारा आयोजित अरिहंत कॉलेजऑफ फार्मसी येथे विद्यार्थीसाठी ढाई आखर राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले होते.या पत्रलेखनचा विषय *डिजिटल इंडिया फॉर न्यू इंडिया*
असा होता.
सदर पत्रलेखन स्पर्धा ही संपूर्ण देशभर दि01/08/23 ते 31/10/23 दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती. आजच्या पत्रलेखन स्पर्धेतदोनशेपेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेत आंतरदेशीय पत्रावर निबंध लेखन केले. स्पर्धकांची प्राप्त आंतरदेशीय पत्र हे
*मा मुख्य पोस्टमास्तर जनरल मुंबई* यांना पाठविण्यात येणार आहेत.
राज्यपातळीवर प्राप्त पत्रलेखना मधील तीन स्पर्धेकाना ,तर देशपातळीवर तीन स्पर्धाकांना डाक विभागाच्या वतीने पारितोषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
याप्रसंगी बोलताना केडगावचे पोस्टमास्तर श्री संतोष यादव यांनी पोस्ट ऑफिसच्या स्थापनेपासून ते आज पर्यतचा प्रवास,वेळोवेळी होत असलेले बदल,व आजचे पोस्ट ऑफिस हा विषयीचा सर्व माहीती यासह पोस्टाच्या विविध योजना सविस्तरपणे विद्यार्थीसमोर ठेवल्या.
पोस्ट ऑफिसच्या *मायस्टॅम्प* योजनेनुसार अवघ्या रु तीनशे मध्ये आपणही आपला स्वतःचा फोटो असणारा स्टॅम्प बनवू शकतो.आपणही सर्वानी या योजनेअंतर्गत आपला स्टॅम्प बनवावा असे आवाहन केले.
प्रमुख मार्गदर्शक डाक विभागाचे प्रवर अधिक्षक श्री सुरेश बन्सोडे यांनी, डाक सप्ताहातील फिलाटेली दिवसाच्या निमित्ताने पोस्ट ऑफीसमधील विविध स्टॅम्प,स्टॅम्प संग्रहाचे महत्त्व, फिलाटेली स्टॅम्पला संग्रहाकाकडून असणारी विशेष मागणी,स्टॅम्पचे मार्केट मधील महत्त्व याविषयी सविस्तरपणे माहिती दिली व आपणही असा स्टॅम्प संग्रह आपल्याकडे ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करत,त्यासाठी आपल्याद्वारे पोस्टऑफिस मध्ये सर्वानी फिलाटेली अकाउंट(FDA) उघडावे, त्याद्वारे आपणास पोस्ट ऑफिसमध्ये येणारे नवनवीन स्टॅम्प प्राप्त करावेत असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ श्री योगेश बाफना यांनी बोलताना पोस्टऑफिसच्या विश्वासार्ह व लोकाभिमुख असणाऱ्या,व विद्यार्थीस आवश्यक असणाऱ्या योजना कॉलेजमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येतील असे सांगितले.
डाक सप्ताहाचे औचित्य साधत श्री सुरेशजी बन्सोडे, संतोष यादव,श्री दिपक नागपुरे, श्री सुनिल भागवत यांचा गौरव केला.
डाक विभागाचे वतीने प्राचार्य डॉ योगेशजी बाफना यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ योगेशजी बाफना हे होते. प्रास्ताविक श्री संतोष यादव यांनी तर आभार श्री बर्डे सर यांनी केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक,सर्व अधिकारी,कर्मचारी,पोस्ट विभागातील कर्मचारी याच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करणेकरिता श्री अमोल बर्डे सर,श्री स्वप्नील काळे सर, बाळासाहेब भागवत, श्रीमती शुभांगी मांडगे, श्रीमती प्रियांका भोपळे ,दिपक भुसारे,श्री सोमनाथ घोडके,अंबादास सुद्रीक,संजीव पवार,शिवाजी कांबळे यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
----------------------------------------
कोट:
विद्यार्थीमध्ये पत्रलेखनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ढाई आखर राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येत असते,आजच्या पत्रलेखन स्पर्धेस विद्यार्थीद्वारा भरघोस प्रतिसाद मिळाला.
Post a Comment