*मिरी येथील अकरा दिवस धनगर आरक्षणासाठी उपोषण करणारे.*
*जेष्ठ नेते राजुमामा तागड व बाळासाहेब कोळसे..*
मिरी (वार्ताहर)भावांनो,धनगरांना ST चे आरक्षण मिळूच नये म्हणून महाराष्ट्रातील लबाड जाणत्या प्रस्थापित घरानेशाहीनी गेली ७३ वर्षापासून धनगरांना ST आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम मोठ्या सिताफिने मा.काकासाहेब कालेलकर कमीशन नंतर केले धनगरांचा "धनगड" तयार करून केले हे नीट समजून घेतले पाहिजेत .
भावांनो,धनगरांची प्रचंड लोकसंख्या भारत भर असून त्यातल्या त्यात महाराष्ट्रात ती जवळपास १९% वर आहे.हे १९% धनगर राजकीय "जागृत/प्रगल्भ" झाले तर आपली राजकीय दुकाने बंद पडतील याचा सखोल अभ्यास करून "लबाड" प्रस्थापित राजकारण्यांनी करून वेगवेगळ्या मार्गाने ते धनगरांचा राजकीय मार्ग रोखतात आहेत.तरी पण आपण धनगर लाचारीचे "लक्तरे" सोडून साहेबांना 'जय महाराष्ट्र' करायला तयारच नाही आहोत हीच मोठी शोकांतिका आहे.
भावांनो, एकीकडे विरोधी बाकावर असतांना मार कंपाळी भांडारा हातात काठी अन् खांद्यावर घोंगडं टाकून "ऊर" फोडून बोंबलायचे धनगरांना ST आरक्षण मिळायलेच पाहिजेत अन् दुसरीकडे आदिवासी नेत्यांना भडकवून सामाजिक "सलोखा" बिघडवून दोन्ही जमातीत कायम "दरी/अंतर" तयार करून आपली राजकीय ऊखळं पिवळी करून घ्यायची असली किळसवाणी "लबाड निती" करून धनगर जमात राजकीय दारिद्र्यात कायम ठेवण्याचे काम सुरू आहे.हे आपण 'हिरवळ' यांच्या वक्तव्यावर समजू शकता.'हिरवळ' म्हणतात "एक मेंढरू" विधानपरिषदेत चुकून येऊन आरक्षण मागते.आम्ही १६ आहोत.धनगरांना आरक्षण मिळूच देणार नाही अशी वक्तव्य करतांना दिसतात.तरी ही साहेब की जय हो,ताई जय हो करणारी धनगरांची लाचार सतरंज्या ऊचलू निष्ठावान "भक्त/भक्तीनी" मोठ्या चवीनी करून आपल्याच नेतृत्वर आग ओकतांना आपण बघतच आहोत.
भावांनो,याचा एकच "अर्थ" धनगरांचे उमदे नेतृत्व कायमचे घूडून टाकणे हे होय.मग यात उंच्च शिक्षित मा.मंत्री आमदार प्रा.राम शिंदे साहेब तसेच
जिगरबाज बहुजन ह्रदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे असोत की,इतर तरूण तडफदार नव नेतृत्व असो.मित्रहो प्रस्थापित "लबाड" राजकीय घरानेशाहीला आपल्या "लबाड" नितीच्या विरोधात बोलून "राजकीय जनजागृती" करणारे नकोत.तेच काम आज घडीला मा.मंत्री आमदार प्रा.राम शिंदे साहेब
आमदार गोपीचंद पडळकर साहेब कराता आहेत म्हणून त्यांना संपविण्याचे काम ही मंडळी करतात आहेत.यासाठी त्यांना आपल्या खास "पाळीव" कुत्र्यांना त्यांच्यावर भुंकण्यासाठी मोकळे सोडले आहेत.यात घासलेट चोरांसारखी अनेक पदाची तुकडे खाणारी आपल्या नेत्यांवर भुंकतांना दिसतात.तरीही आपण काहीही बदल करायला तयार नाही आहोत यास काय म्हणावं???
भावांनो, काळानूरूप संदर्भ बदलतात व त्यानुसार मानसांनी बदललं पाहिजेत हा "नैसर्गिक" नियम असतांना आपण त्यानूसार "बदलायला" तयार नसाल तर तुमचं राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक भविष्य अंधारमय आहे हे सांगण्यासाठी कुठल्याही "ज्योतिष्यांची" गरज नाही..भावांनो,शत्रू- मित्र ओळखून *"तुम्ही बदला, जग निश्चित बदलेल"*.स्वकीय जवळ करून उपेक्षित,वंचित, पिडित,लहान लहान जात समूह जवळ करा.बघा तुमचा उषःकाल झाल्याशिवाय राहाणार नाही..
Post a Comment