जेजुरीच्या मल्हारगडावर होणार धनगर समाजाचा दसरा मेळावा




अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकरी, कष्टकरी, मेंढपाळ, पशुपालक, उपेक्षित, ओबीसी, भटके विमुक्त समाजाचा जेजुरीचा मल्हारगड दसरा महामेळावा येत्या 29 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता होणार असल्याची माहिती मल्हारगड दसरा महामेळावा संयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी दिली.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत अर्थात जेजुरी येथील श्री मल्हारी मार्तंडाच्या मल्हारगडाच्या पायथ्याशी गेली काही वर्षे दसरा मेळाव्याचे आयोजन होत असते. यावर्षीचा मल्हारगड महामेळावा 29 ऑक्टोबरला होणार आहे. यासंदर्भात नुकतीच संयोजन समितीची जेजुरी येथे बैठक झाली. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार यावर्षीचा दसरा मेळावा महाराष्ट्रातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर वाचा फोडणारा असेल. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील पशुपालक, शेतकरी, मेंढपाळ, कष्टकरी, कामगार,वारकरी, उद्योजक, अधिकारी, विद्यार्थी, पदाधिकारी, युवक, कार्यकर्ते यांच्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा आहे.
अठरापगड जाती- जमातीमधील समाजाच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि खंडेरायाच्या दरबारात आपल्या मागण्याचे साकडे  घालण्यासाठी व सरकारला याची जाणीव करून देण्यासाठी लाखोच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून मल्हारभक्तांनी यावे, असे आवाहन समितीचे संस्थापक अध्यक्ष पडळकर यांनी केले. यावेळी प्रा. किसन हजारे, नथुराम डोईफोडे, तुकाराम कोकरे, बाळासाहेब मरगळे, संतोष खोमणे, यशवंत पडळकर, राम जानकर, गणेश कुंभार, वैभव लंबाते, श्रवण पवार, सूरज रणदिवे, भाऊसाहेब कोकरे, मोहन खामगळ उपस्थित होते.
--

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post