नगर - परदेशात असलेल्या नातेवाइकांची दिवाळी गोड करण्यासाठी शंभरपेक्षा अधिक देशांत फराळ आणि भेटवस्तु पाठविण्याची विशेष सुविधा टपाल विभागाने उपलब्ध केली आहे. अहमदनगर प्रधान टपाल कार्यालयात फराळ आणि भेटवस्तूंच्या पॅकेजिंगची सोयही यंदा करण्यात आली असून, वजनानुसार शुल्क आकारण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ डाक अधिक्षक सुरेश बनसोडे यांनी दिली.
पॅकिंगबाबत मार्गदर्शन
पोस्टाच्या अहमदनगर प्रधान डाक घर कार्यालयातर्फे परदेशात फराळ पाठवता येणार आहे. नागरिकांनी पिशव्यांमध्ये आणलेले साहित्य आंतरराष्ट्रीय निकषांनुसार बॉक्समध्ये पॅक करून देण्यासह कागदपत्रांच्या पूर्ततेबाबतही टपाल कर्मचारी मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयात किंवा अहमदनगर प्रधान डाकघर येथे संपर्क साधावा.
टपाल खात्याच्या सेवेला प्रतिसादखासगी स्पर्धक कितीही वाढले, तरी टपाल खात्यावरील विश्वासार्हतेमुळे नागरिकांच्या स्पीड पोस्टसह आंतरराष्ट्रीय सेवेला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातून परदेशात नोकरीनिमित तसेच शिक्षणासाठी जाणार्यांची संख्या अलीकडील काळात खूप वाढली आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेतही लक्षणीय वाढ होत आहे. प्रामुख्याने दिवाळीत प्रत्येकाला भारतात येणे शक्य होत नाही. त्यामुळे मोठया प्रमाणात खाद्यपदार्थ भेटवस्तूंसह इतर सामान परदेशात पाठवले जाते.
येथे मिळणार सुविधा
परदेशात साहित्य पाठवणे सोपे यासाठी आम्ही शहरातील सर्व टपाल कार्यालयात सुविधा उपलब्ध केली आहे.
दिवाळी कुरिअर सेवेलाही दर वर्षी नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी आम्ही मुख्य टपाल कार्यालयात आधुनिक पद्धतीची दर्जेदार पॅकेजिंग सुविधा उपलब्ध केली असल्याचे वरिष्ठ डाक अधिक्षक सुरेश बनसोडे यांनी सांगितले.
----------
दिपक नागापुरे (विपणन अधिकारी)
Post a Comment