सामाजिक ,वैद्यकीय, शैक्षणिक , पत्रकारिता आदी क्षेत्रात गौरवास्पद काम करणा-या पाच व्यक्तींना राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
त्यामध्ये श्री.डॉ.दिलीप बजरंग मगदूम,श्री.बबनराव अवघडी रानगे ,श्री.विलासराव कोळेकर, श्री.इंजी.दत्तात्रय शामराव माने व सौ.अनुराधा प्रभाकर देशमुख हे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
स्व. डॉ. बाबुराव घोडके (दादा) यांचा द्वितीय पुण्यस्मरण दिन रविवार दि. ०५ / ११ / २०२३ रोजी आहे. सामाजिक कामाची विशेष दखल घेऊन डॉ. बाबुराव घोडके फाऊंडेशनच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय 'रयतधारा' पुरस्कार २०२३ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच रयतधारा प्रेरणा पुरस्कार श्री.अंबाजी तुकाराम कोळेकर,डॉ. शंकरराव आनंदराव माने,श्री. राजाराम बापू वाठरकर,श्री.संपतराव आकाराम ठोंबरे,श्री.बिराप्पा सिद्दप्पा चिकबिरे यांना जाहीर करण्यात आला आहे.आपल्या समाजसेवेचा आदर्श इतरांनी घ्यावा व समाजामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी हा यामागचा उदात्त, उत्कट आणि उत्तुंग हेतू आहे.
Post a Comment