नगर - मध्यप्रदेश विधानसभा निवडणुक अंतिम टप्प्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर या राज्यातील विविध मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्यावरही मध्यप्रदेश मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सिहोर जिल्ह्यातील बुधानी मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
याबाबतचे पक्षाच्या कार्यालयाकडून याबाबत आ.राम शिंदे यांना कळविण्यात आले आहे. आ .शिंदे हे आज (दि
१९)झेलम एक्स्प्रेस ने जाणार असून उदया सकाळी या मतदासंघातील आढावा घेणार आहेत.
आ.राम शिंदे यांच्यावर नेहमीच विवध राज्यातील जबाबदारी देण्यात येत असते. आता तर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मतदार संघाची सोपवलेली जबाबदारी महत्वाची मानली जात आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या टिममध्ये आ.राम शिंदे यांचा समवेश असल्याने नेहमीच त्यांच्यावर विविध राज्यातील निवडणुकीची जबाबदारी देण्यात येते. गेल्याच आठवड्यात तेलंगणा महत्वाच्या जगतीयाल जिल्ह्यातील मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली होती.
तसेच यापुर्वीही गोवा, कर्नाटक राज्यातील निवडणुकांची जबाबदारीही देण्यात आली होती. पक्षांतर्गत आ.प्रा.राम शिंदे यांचे महत्व वाढत असल्याने त्यांच्यावर केंद्रीय पातळीवरवेगवेगळ्या जबाबदार्या देण्यात येत आहे.