नगर तालुका ( प्रतिनिधी ) : मांडवे ता.नगर येथे मनोज जरांगे तसेच मराठा आरक्षणाला पाठिंबा देत नुकतेच मराठा समाजाने मुख्य चौकात साखळी उपोषणास सुरुवात केली असून नुकतेच गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करत असल्याचे पोस्टर प्रसारित करून राजकीय नेत्यांना एक इशारा देत मनोज जरांगे यांना पाठिंबा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना मनोज जरांगे यांच्यासह मराठा आरक्षणाला पाठिंबा देत मांडवे येथे सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्या वतीने आज सकाळपासून साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे.
Post a Comment