अहमदनगरचे सुपुत्र तर सध्या मुंबई स्थित प्रसिद्ध उद्योजक .सौरभ बोरा यांची जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांच्या मित्र परिवरातर्फ़े शिल्पा गार्डन येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभात अ.भा श्वे.स्था. जैन कॉन्फरन्स दिल्लीचे राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शक श्री. अशोक बाबूशेठ बोरा यांनी त्यांचा राजस्थानी पगडी, हार शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच श्री जैन ओसवाल वात्सल्य संस्थेचे मा. सचिव श्री.विजय गुगळे व श्री.किशोर पितळे यांच्या हस्ते देखील त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी रमेश सोनीमंडलेचा, किशोर पितळे, विजय गुंदेचा, वंदे मातरम युवा प्रतिष्ठानचे प्रतीक बोगावत, सौरभ भांडेकर तसेच अर्बन बँकेचे संचालक अजय बोरा, ईश्वर बोरा आदी उपस्थित होते.
Post a Comment