कर्जत-जामखेड सोशल मिडीया माध्यमात उत्कृष्ठ कामगिरीच्या पुरस्काराने उध्दव हुलगुंडे(चेअरमन) यांचा सन्मान

 


पक्ष आणि पक्षनेतृत्वाची विचारधारा निस्वार्थपणे सोशल मिडीयाच्या माध्यमातुन सर्वसामान्य माणसापर्यंत जबाबदारीने पोहचविण्याचं काम करणारे मा उध्दव हुलगुंडे(चेअरमन) हे सोशल मिडीया माध्यमातले कोहीनुर हीरा आहेत*

 *सभापती -शरद (दादा)कार्ले*

 संकल्प बहुउद्देशिय ग्रामविकास संस्थेकडुन दरवर्षी दिला जाणा-या सर्वोकृष्ठ सोशल मिडीया कामगिरी पुरस्कासाठी जामखेड भाजपा सोशल मिडीया प्रमुख मा,उध्दव हुलंगुडे(चेअरमन) यांची  यावर्षी संस्थेकडुन निवड करण्यात आली आहे,

संकल्प बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष मा,शिवाजी सातव यांच्याकडुन, जामखेड बाजार समितीचे सभापती मा,शरद (दादा) कार्ले यांच्या उपस्थितीत

कर्जत-जामखेड तालुका भाजपा सोशल मिडीया प्रमुख मा,उध्दव हुलगुंडे यांची सर्वोत्कृष्ठ सोशल मिडीया कामगिरी या पुरस्कारासाठी आणि खा सुजय विखे यांचे स्विय सहाय्यक मा,योगीराज राऊत यांची समाजभुषण या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे,

सोशल मिडीयाच्या माध्यमातुन भारतीय जनता पार्टिची विचारधारा कर्जत-जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावात,सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचविणारे मा,उध्दव हुलगुंडे यांच्या कामगिरीचा ख-या अर्थाने हा मोठा सन्मान आहे,

सध्याच्या राजकारणात नेतृत्व आणि पक्षासाठी निस्वार्थपणे काम करणारांची संख्या खुप कमी असते, त्यापैकीच एक म्हणजे मा उध्दव हुलगुंडे ज्यांना उध्दव चेअरमन या नावानेच तालुक्यात ओळखल जातं,पक्षाचे ध्येय,धोरण आणि विचारसरणी सामान्य माणसापर्यंत पोहचली पाहीजे, आणि सामान्य माणसाचा पक्ष नेतृत्वारचा विश्वास वाढला पाहीजे एवढचं उध्दिष्ठ डोळ्यासमोर ठेऊन गेली 20 वर्षे चेअरमन मेहनत घेत आहेत,त्यासाठी कुठली खास यंत्रणा सोबत नाही,मिडीया मॅनेजमेंट साठी आॅफीस नाही दिवसातले 18-20 तास जनतेत राहुनचं सोशल मिडीयाची जबाबदारी चेअरमन पार पाडतात,आपल्या लेखणीतुन विरोधकांच्या चुकांवर मुद्देसुद सडेतोड टिका करतात पण कधीच कुठलं वादग्रस्त लिखाण चेअरमनकडुन होत नाही त्यांची  ही गोष्टही नक्कीच कौतुकास्पद आहे,विरोधकांनी टिकेची मर्यादा सोडली तरी त्याकडे दुर्लक्ष करून  आपलं काम प्रमाणिकपणे करण्यावरचं चेअरमन यांचं लक्ष असतं, 

सध्याच्या राजकारणात सोशल मिडीया हा राजकारणाचा महत्वाचा भाग बनला आहे प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेता सोशल मिडीयाच्या माध्यमातुनचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असतात,

आमदार प्रा राम शिंदेसाहेबांनी सोशल मिडीयाची महत्वाची दिलेली जबाबदारी उध्दव चेअरमन योग्य पध्दतीने पार पाडत आहेत, आ प्रा राम शिंदेसाहेबांची मतदारसंघासह महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रा बाहेरीलही कामाची,पक्षसंघटनेच्या बैठकांची माहीती जमा करून रोज सोशल मिडीयाच्या माध्यमातुन कर्जत-जामखेडच्या जनतेपर्यंत पोहचविण्याचं काम रात्री उशिरापर्यंत चेअरमन करत असतातं,

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतरचे अडीच वर्षे कर्जत-जामखेड मतदारसंघात हुकुमशाही राजकारण सुरू झालं होत सत्ताधारी लोकप्रतिनीधींच्या चुकीच्या कामाच्या विरोधात बोलण्याचही कोणी धाडसं करत नव्हतं त्या काळात सत्ताधा-यांकडुन सर्वसामान्य माणसावरं होणा-या अन्यायाविरोधात चेअरमन सोशल मिडीयाच्या माध्यमातुन लढा देत होते, विरोधकांकडुन त्यांचा आवाज दाबण्यासाठी कार्यकर्त्यांना हाताशी धरून काहीवेळा त्यांच्यावर खोटे गुन्हेही दाखल करण्यातं आले,पण विरोधकांच्या कसल्याच दबावाला बळी न पडता आपलं काम निस्वार्थपणे सुरू ठेवुन आपल्या नेतृत्वाची आणि पक्षाची बाजु लावुन धरणारे मा,उध्दव हुलगुंडे (चेअरमन) खरोखरचं सोशल मिडीया माध्यमातले कोहीनुर हिरा आहेत,

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post