जागतिक स्तनपान सप्ताह २०२१: ‘स्तनपानाचे संरक्षण’ ही सामूहिक बांधिलकी..




रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल व विखे पाटील फाउंडेशनचे कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येत आहे.


नगर : १-७ ऑगस्ट या काळात दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह अनेक देशांमध्ये साजरा होतो. याची मूळ संकल्पना व जागतिक समन्वय वाबा (WABA:World Alliance of Breastfeeding Action) या संस्थेची आहे. १९९२ मध्ये पहिला जागतिक स्तनपान सप्ताह साजरा झाला. प्रत्येक वर्षी नवीन घोषवाक्यासह हा दिवस साजरा होतो. या वर्षीचे घोषवाक्य ‘इनेबल ब्रेस्टफीडिंग- मेकिंग अ डिफ्रन्स फॉर वर्किंग वूमेन' हे आहे. नवीन मातांना स्तनपानासाठी पाठिंबा आणि प्रोत्साहनाची आवश्यकता असते. जन्मणा-या बाळाच्या वाढीसाठी मातेचं दूध अत्यंत गरजेचे असते. दुधात सानुल्या बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची अन्नद्रव्ये समाविष्ट असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, बाळ जन्मल्यानंतर पाहिल्या एक तासापासून ते सहा महिन्यांचे होईपर्यंत आईच्या स्तनपानावर वाढले पाहिजे. बाळाच्या जन्माच्या एका तासात बाळाला पहिले स्तनपान मिळावे याची खात्री करणे ही केवळ आईचीच नाही तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. स्तनपान हा पर्याय नसून संकल्प आहे. हा वसा फक्त आठवड्यापुरता मर्यादित न राखता पूर्ण वर्ष राबवावा.


महिलांनी कधीही स्तनपान न करणे किंवा शिफारस केलेल्या वेळेपूर्वी स्तनपान थांबवणे तसेच कामाच्या ठिकाणीची आव्हाने ही पुरेसा स्तनपान ना करण्यामागची सर्वात सामान्य कारण आहे. पालकांना स्तनपानासाठी पुरेसा वेळ आणि समर्थन आवश्यक आहे. 3 महिन्यांपेक्षा कमी प्रसूती रजा असलेल्या पालकांनी 3 किंवा अधिक महिन्यांची रजा असलेल्या पालकांपेक्षा कमी स्तनपान बाबत निष्कर्ष अनेक सर्वेक्षणातून नोंदवला. कामाच्या ठिकाणी स्तनपानास अनुकूल कार्यस्थळ होण्यासाठी पुरेशा स्तनपान सुविधा आवश्यक आहेत. केवळ 42 देश कामाच्या ठिकाणी स्तनपान सुविधा अनिवार्य करतात. स्तनपानाचे संरक्षण, प्रचार आणि समर्थन शाश्वत विकासाच्या मार्गात उभ्या असलेल्या असमानता दूर करते.  सौ.जयमाला पवार/केदारी

स्तनपान सल्लागार, BPNI जिल्हा प्रशिक्षक यांनी प्रमुख व्याख्याता म्हणून उपस्थित राहून नवदा व गरोदर माताना याविषयी मार्गदर्शन केले. 

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल व विखे पाटील फाउंडेशनचे कॉलेज ऑफ नर्सिंग च्या संयुक्त पुढाकारातून १ ते ७ ऑगस्ट या दरम्यान वेगवेगळे मार्गदर्शन पर व्याख्यान विलद घाट येथील कॉलेज ऑफ नर्सिंग, अहमदनगर   डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश मोरे यांच्या सहाय्याने आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमात डॉ. विठलराव विखे पाटील फाउंडेशन चे कॉलेज ऑफ नर्सिग येथील प्रसूती आणि स्त्रीरोग नर्सिंग विभाग, बाल आरोग्य नर्सिंग विभाग तसेच सामुदायिक आरोग्य नर्सिंग विभाग तर्फे डॉ. योगिता औताडे यांची देखील मदत मिळाल्याबाबत रोटरी क्लब चे अध्यक्ष रो. हरीश नय्यर, मा. सचिव रो. डॉ. कुणाल कोल्हे व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे यूथ सर्व्हिसेस डायरेक्टर रो. ईश्वर बोरा यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत दिनांक 3 रोजी महिला पोलिस अधिकाऱ्यांमध्ये स्तनपान जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून दिनांक ७ रोजी या वर्षीच्या थीम- "स्तनपान सक्षम करणे: कार्यरत पालकांसाठी फरक करणे." या वर फ्लॅश मॉब करण्यात येणार असल्याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

डॉ. विखे पाटील फाउंडेशन चे कॉलेज ऑफ नर्सिंग तर्फे कार्यक्रमाचे निवेदन सौ पल्लवी कोळपकर आणि सौ सलोमी तेलधूने यांनी केले. प्राचार्या डॉ. प्रतिभा चांदेकर यांनी स्तनपानाचे महत्त्व व्यक्त केले. सौ. मोहिनी सोनावणे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post