केडगाव पोस्टऑफिस विभागात अल्पबचत योजनेत अव्वल

 पोस्ट: वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा

पोस्ट ऑफिसच्या विविध योजना लोकाभिमुख करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न होणे  अपेक्षित ...श्री रामचंद्र जायभाये
●केडगाव पोस्टऑफिस विभागात अल्पबचत योजनेत   अव्वल

केडगाव:  अहमदनगर डाक विभागामध्ये आर्थिक वर्ष 2022 - 2023 मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचारी,अधिकारी यांचा विशेष गौरव सोहळा,पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल,अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र मा श्री रामचंद्र जायभाये,व श्रीमती सिमरन कौर डायरेक्टर पोस्टल सर्विसेस पुणे विभाग तर श्रीमती जी हनी  अधिक्षक डाकघर अहमदनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत सीएसआरडी कॉलेजच्या हॉलमध्ये संपन्न झाला.
भारतीय पोस्ट विभागाच्या विविध योजनांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या जवळपास सत्तर कर्मचारी, अधिकारी,अल्पबचत अभिकर्ते, ग्रामीण डाकसेवक यांना याप्रसंगी गौरविण्यातआले.
याप्रसंगी केडगाव पोस्टऑफिसला दोन योजनेत प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
अहमदनगर आरएस पोस्ट ऑफिसच्या वतीने अल्पबचत योजनेचे आर्थिक वर्षात 5999 नवीन अकाउंट उघडण्याचे विक्रमी काम केल्याने विभागात  प्रथम पारितोषिक देऊन श्री संतोष यादव पोस्टमास्तर  केडगाव तर पोस्टल लाईफ इन्शुरन्समध्ये  उल्लेखनीय काम करणाऱ्या सौ शुभांगी योगेश मांडगे यांना डिपार्टमेंटल कर्मचारी गटात प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
सौ शुभांगी मांडगे यांनी दि 1 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2023 दरम्यान घेण्यात आलेल्या *आपकी सुरक्षा हमारा भरोसा* या मिशनमध्ये रु 248014 इतका प्रीमियम जमा केला, यासह आर्थिक वर्षात 565172 इतका विक्रमी प्रिमीयम जमा करत विभागात प्रथम पारितोषिक पटकावले.
याप्रसंगी श्रीमती सिमरन कौर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,अहमदनगर विभाग विविध योजनेत उल्लेखनीय काम असून यापुढील काळातही सर्वानी अधिक जोमाने काम करावे व पुढील आर्थिक वर्षात रिजनमधील उल्लेखनीय कामगिरीसाठी असणारा फिरता चषक पुन्हा अहमदनगर विभागास मिळावा याकरिता सर्वानी प्रयत्न करावेत ही अपेक्षा त्यानी व्यक्त करत,सर्व पुरस्कारप्राप्त कर्मचारी अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
मा श्री रामचंद्र जायभये यांनी  आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डाक विभागाच्या लोकप्रिय असणाऱ्या विविध योजनाअधिक लोकाभिमुख करण्याकरिता सर्वानी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करत,सर्व पुरस्कार प्राप्त कर्मचारी,अधिकारी,ग्रामीण डाकसेवक,अभिकर्ते, यांचे विशेष कौतुक करत,पुढील आर्थिक वर्षातील कामगिरीसाठी शुभेच्छा देत,अहमदनगर विभाग अग्रेसर ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी निवडक पुरस्कारप्राप्त कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती जी हनी अधिक्षक डाकघर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदिप हदगल,श्री कमलेश मिरगणे, व श्रीमती मोनाली हिंगे यांनी तर आभार प्रदर्शन श्री बाळासाहेब बनकर यांनी केले.
कार्यक्रमासाठी श्री संदिप कोकाटे,श्री दत्तात्रय वराडी पुणे,श्री सोमनाथ तांबे शेवगाव,श्री अमित देशमुख कर्जत श्री अमोल भूमकर यांचेसह विभागातील पुरस्कार प्राप्त सबपोस्टमास्तर,ग्रामीण डाकसेवक,अभिकर्ते,यांचेसह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post